तरुण भारत

‘चौकीदार’ ते ‘ब्लॅक एलियन’

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोण काय करेल, ते सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. यासाठी त्रास सोसण्याची आणि यातना सहन करण्याची अशा व्यक्तींची तयारी असते. अशांपैकीच एक असणारा फ्रान्सचा अँथनी लोफेंडो याला ‘एलियन’ म्हणजे परग्रहावरील मानवासारखे दिसण्याची भलतीच आस लागली. त्यामुळे त्याने आपल्या शरिराचा सारा रंग आणि ढंगच बदलून टाकला. त्याने आपल्या शरीभर अशा प्रकारे ‘टॅटू’ काढून घेतले की आता तो सामान्य माणूस दिसतच नाही. शरीराचे बाकी अवयव सोडा त्याने डोळय़ांच्या बाहुल्यांनाही सोडले नाही. त्यांचा रंग व स्वरूपही त्याने टाटू करून बदलून टाकले आहे.

आता त्याच्यात असे काही परिवर्तन झाले आहे, की लोक त्याच्याकडे बघतच राहतात. लहान मुले त्याला घाबरतात देखील. तो माणूस आहे, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. लोफेंडो हा चौकीदार म्हणून काम करीत होता. त्यावेळी त्याच्या डोक्यात हे एलियन होण्याचे वेड शिरले. त्याने प्रथम ऑस्ट्रेलियात जाऊन स्वतःमध्ये बदल घडविण्यास प्रारंभ केला. हे परिवर्तन एक दोन दिवसात झालेले नाही. त्यासाठी त्याला साडेचार वर्षे अतिशय त्रासदायक व यातनामय बदल स्वतःमध्ये करून घ्यावे लागले आहेत. तथापि, एवढे सोसल्यानंतर त्याच्या रंगरूपाप्रमाणेच आता त्याचे भाग्यही पालटले आहे. त्याला इन्स्टाग्रामवर 2 लाख 81 हजार लोक फॉलो करतात. तो जाईल तेथे पाहण्यासाठी गर्दी हमखास होते.

Advertisements

मात्र, एवढय़ावर त्याला समाधान नाही. अजूनही आपण पूर्णतः एलियन झालेलो नाही अशी त्याची भावना आहे. त्यामुळे त्याला आपल्या शरीरावरची 20 टक्के त्वचा काढून त्याजागी धातूचे आवरण बसवून घ्यायचे आहे. तथापि, हा प्रयोग यशस्वी होईल, याची त्वचाविषारदांना शाश्वती नाही. म्हणून त्याने सध्या हात आवरता घेतला आहे. मात्र एका स्पॅनिश शल्यविशारदाकडून त्याने आपल्या नाकाचा आकार पूर्णपणे बदलून घेतला आहे. त्याच्या या बदललेल्या रूपामुळे त्याला चित्रपटातही काम मिळू शकेल अशी चर्चा आहे.

Related Stories

जपानच्या क्षेत्रात चिनी पाणबुडीची घुसखोरी

Patil_p

अमेरिकेत पुढील महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात

datta jadhav

भारतीय राष्ट्रपतींचा चीनच्या मित्राला संदेश

Patil_p

दहशतवादी हाफिजचे बँक खाते पुन्हा सुरू

Patil_p

चीनकडून भारतीय वेबसाईट, वृत्तपत्रांवर बंदी

datta jadhav

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!