तरुण भारत

महाराष्ट्रात 2,171 नवीन कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,171 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 32 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 15 हजार 525 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 894 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 2556 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 20 हजार 006 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.26% आहे. सद्य स्थितीत राज्यात 43 हजार 393 रुग्ण उपचार घेत आहेत. 

  • मुंबईत 434 नवे रुग्ण 


मुंबईत कालच्या दिवसात 434 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 499 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,07,169 वर पोहचली आहे. तर 2,89,300 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 06 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,319 इतकी आहे. सद्य स्थितीत 5,644 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

कोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात काल 7,620 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कास परिसरात मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 11 जणांना डिस्चार्ज तर 181 जणांचे रिपोर्ट पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

अन् प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Patil_p
error: Content is protected !!