तरुण भारत

मल्टिस्टेट टेटे स्पर्धेत श्रेयस कुलकर्णी, पृथा पारिकर विजेते

तनिष्का काळभैरव उदयोन्मुख टेटेपटू, रायेश रायकर प्रतिभावंत खेळाडू

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेलगाम व बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मल्टिस्टेट निमंत्रितांच्या टेबल टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत श्रेयस कुलकर्णी, महिला गटात पृथा पारिकर यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील उदयोन्मुख टेबलटेनिसपटू म्हणून तनिष्का कपिल काळभैरव तर प्रतिभावंत खेळाडू म्हणून रायेश रायकर यांना खास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मैत्रेयी बैलूर हिचा राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवल्याबद्दल आयजीपी राघवेंद्र सुहास यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला.

क्लबरोडवरील बेळगाव क्लब येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम टेबलटेनिस स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळविण्यात आलेल्या सामन्यात पुरूष गटात पहिल्या उपांत्य सामन्यात श्रेयस कुलकर्णीने विवेक कुंभारचा 12-10, 11-8, 12-10 असा तर सुरज चिंचोळीमठने गणेश हिरेमठचा 11-8, 11-6, 11-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रेयस कुलकर्णीने सुरज चिंचोळीमठवर 7-11, 11-4, 11-9, 12-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवित जेतेपद पटकावले. महिला गटात पहिल्या उपांत्य सामन्यात पृथा पारिकरने जान्हवी बिक्कण्णावरचा 11-6, 11-3, 11-9 तर दुसऱया उपांत्य सामन्यात आनंदिता बासकने अदिती जोशीचा 11-7, 2-11, 11-8, 12-10 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पृथा पारिकरने आनंदिता बासकचा
11-8, 7-11, 6-11, 11-9, 11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच. जी. राघवेंद्र सुहास, कर्नाटक टेटे संघटनेचे सचिव टी. जी. उपाध्ये, जिल्हा पंचायत सदस्य ऍड. रमेश देशपांडे, कर्नाटक राज्य टेटे संघटनेचे उपाध्यक्ष संगम बैलूर, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अजय हेडा, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अशोक काडापुरे, नारायण बंग, निलेश बंग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविलेली बेळगावची तनिष्का काळभैरवला उदयोन्मुख टेबलटेनिसपटू व 5 वर्षाच्या रायेश रायकरला स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडू म्हणून राघवेंद्र सुहास यांच्या हस्ते खास बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी कपिल काळभैरव, महेश अनगोळकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव जिल्हा टे. टे.च्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी बेळगाव क्लबने हॉल उपलब्ध करुन दिला होता.

Related Stories

जि. पं. अध्यक्षांची जिल्हा कोविड हॉस्पिटलला भेट

Patil_p

झोपेत असताना अनोळखी वृध्दाचा मृत्यू

Patil_p

चेंबर ऑफ कॉमर्समध्ये कै.रावसाहेब गोगटेंच्या प्रतिमेचे अनावरण

Patil_p

जेएमएफसी आवारात पुन्हा वाहनांची गर्दी

Amit Kulkarni

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

वॉर्ड आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Amit Kulkarni
error: Content is protected !!