तरुण भारत

बाळेकुंद्री खुर्द परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात

वार्ताहर / बाळेकुंद्री

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार व शिक्षण खात्यातर्फे देण्यात आलेल्या सूचनांनुसार 72 वा प्रजासत्ताक दिन बाळेपुंद्री खुर्द व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisements

जनता कॉलेज

बाळेकुंद्री जनता पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्राचार्य एम. एस. वक्कुंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. आर. व्ही. नंदरगे, मुख्याध्यापक एस. के. बिर्जे, के. एम. पायन्नावर, एस. जी. कदम उपस्थित होते.

बाळेकुंद्री मराठी शाळा

बाळेकुंद्री येथील सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण  एसडीएमसी अध्यक्ष श्याम कन्नेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतन ग्राम पंचायत सदस्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर व ध्वजस्तंभाचे पूजन केले. कांचन उरणकर व काशिनाथ अक्कतंगेरहाळ उपस्थित होते.

मारिहाळ पोलीस ठाणे

मारिहाळ पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. पोलीस ठाण्याचे सीपीआय लक्काप्पा मंट्टूर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलिसांनी राष्ट्रगीताचे बिगूल वाजवून ध्वजाला मानवंदना देऊन पथसंचलन केले. यावेळी मारिहाळ पोलीस ठाण्यातील पोलीसवर्ग उपस्थित होता.

कोंडसकोप्प मराठी शाळा

कोंडसकोप्प येथील सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिमेचे पूजन बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक पी.बी. खन्नूकर यांनी स्वागत केले. एस. आर. सिंगारी, आनंद ढगे व रेखा कोकितकर यांची भाषणे झाली. यावेळी गावातील सर्व युवक मंडळे व पालकवर्ग उपस्थित होता.

कॅनरा बँक पंत बाळेकुंद्री

कॅनरा बँक पंत बाळेकुंद्रीच्या शाखेत बँकेचे मॅनेजर प्रशांत आर. घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बँकेचे गिरीश यादगिरी, विनायक चौधरी यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रसाद एस., अजित तळवार, बसू सोनजी, संतोष, कांचन व गोकूळ यांसह बँकेचा ग्राहकवर्ग उपस्थित होता.

बाळेकुंद्री कन्नड शाळा

येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण नूतन ग्रा.पं. सदस्य युवराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन नूतन सदस्या रेणुका करविनकोप्प, शांता चंदगडकर व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक एन. एस. पाल यांनी स्वागत केले. हणमंत हन्नीकेरी, दशरथ चौबारी, यशवंतराव जाधव, काशीनाथ सुतार यांसह युवक मंडळे व पालकवर्ग उपस्थित होता.

श्रमदानातून गटारी साफ

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी गल्ली बाळेकुंद्री येथील युवक मंडळांनी सरकारी शाळेलगत असणाऱया गटारेत पसरलेला कचरा श्रमदानातून स्वच्छ केला. तसेच शाळेला स्वनिधीतून प्रवेशगेट व ध्वजस्तंभ तयार करून दिला. या युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे तसेच केलेल्या कार्याचे समस्त ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे. माल्लिकार्जुन करविनकोप्प, इरफान कुडची, संतोष चिक्कनगौडर, सुमीत चंदगडकर, शिवू सुतार, रोहित तेलकर यांच्यासह गल्लीतील कार्यकर्ते श्रमदानात सहभागी झाले होते.

Related Stories

पर्यावरण संरक्षणासाठी 16 हजार कि.मी.सायकल प्रवास

Patil_p

पश्चिम भागातील रस्ते खड्डय़ात हरवल्याने नागरिकांचे हाल

Amit Kulkarni

अकरा वर्षीय बालिकेवर बलात्कार

Rohan_P

मंगळवारी जिल्हय़ात 29 जण कोरोना बाधित

Patil_p

बेळगाव-शेडबाळ रेल्वे 12 सप्टेंबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

कणकुंबीजवळ 11 लाखांची दारू जप्त

Patil_p
error: Content is protected !!