तरुण भारत

कारवार जिल्हय़ात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हास्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभाचे पोलीस कवायत मैदानावर आयोजन : जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी / कारवार

Advertisements

जिल्हय़ात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हय़ातील अनेक ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभाचे आयोजन येथील पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले होते. कामगार आणि जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना हेब्बार म्हणाले, आमचा देश सार्वभौमत्व, सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षतता, लोकशाही तत्त्वांच्या पायावर उभारण्यात आलेला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आमच्या देशामध्ये नांदत आहे. देशाने प्रगतीच्या मार्गावर झपाटय़ाने वाटचाल सुरू ठेवली आहे. देशाला आणखीन बलिष्ठ करण्यासाठी प्रत्येक देशवासियाने आपल्या परीने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन करून मंत्री हेब्बार पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन सात दशकाहून अधिक कालावधी लोटला आहे. या कालावधीत देशाने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक, संरक्षण, वाणिज्य, व्यापार, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेगवेगळय़ा क्षेत्रात असलेल्या असमानतेला हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ध्वजारोहणापूर्वी वेगवेगळय़ा पथकांनी सादर केलेल्या आकर्षक पथसंचलनाची पाहणी मंत्री हेब्बार यांनी केली. कारवारच्या आमदार रुपाली नाईक, जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के., जि. पं. च्या मुख्य कार्यदर्शी प्रियांगा एम., अतिरिक्त जिल्हाधिकारी एच. के. कृष्णमूर्ती, जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराजूसह अनेक जण ध्वजारोहण सोहळय़ात सहभागी झाले होते.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार कार्यालय इमारत

ध्वजारोहण सोहळय़ानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शिवराम हेब्बार यांनी, कारवार जिल्हय़ातील सर्व बारा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च करून कामगार कार्यालयासाठी इमारती बांधण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्हास्तरीय कामगार कार्यालय इमारत कारवार येथे बांधण्यात येणार असून या इमारतीवर अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे सांगितले.

विमानतळ उभारणीचे कार्य लवकरच सुरू होणार

अंकोला तालुक्यातील अलगेरी येथे विमानतळ सुरू करण्यासाठी यापूर्वीच अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ उभारण्याची पूर्वतयारी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मार्चच्या अखेरीला किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला विमानतळ उभारणीच्या कार्याला सुरुवात करण्यात येईल, असे पुढे हेब्बार यांनी सांगितले.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

Patil_p

ओलमणी गाव कंटेन्मेंट झोन घोषित

Amit Kulkarni

समुदाय भवन इमारतीवर स्लॅब घालणार

Omkar B

कर्नाटकमध्ये सोमवारी ४,२६७ बाधित,११४ जणांचा मृत्यू तर ५,२१८ जणांना डिस्चार्ज

Abhijeet Shinde

कांदा, बटाटा, रताळी दरात वाढ

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!