तरुण भारत

जी.जी. चिटणीस हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

प्रतिनिधी / बेळगाव

टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्रजी हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, व्ही. एन. जोशी, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार उपस्थित होते.

Advertisements

किर्तना सुतारने ईशस्तवन सादर केले. उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थी अमित पाटील, अनन्या रथकर व प्रसाद सांबरेकर यांची भाषणे झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध व भाषण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली.

व्ही. एन. जोशी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन अनन्या रथकर व विनायक डिचोलकर यांनी केले. कुंजल पवारने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. व्ही. जोशी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

पिरनवाडीत रस्ता रुंदीकरणाचा घाट

Amit Kulkarni

उद्यानांच्या स्वच्छतेसाठी माजी नगरसेवक सरसावले

Amit Kulkarni

शरीर सुदृढ राहण्यासाठी जिम्स्ना परवानगी द्या

Patil_p

हिरेबागेवाडी-कोगनोळी महामार्गाची ‘मॉनेटायझेशन’साठी निवड

Amit Kulkarni

खाद्यतेल महाग, गृहिणींना वैताग!

Amit Kulkarni

आजपासून जिल्हय़ात अनलॉकची अंमलबजावणी

Omkar B
error: Content is protected !!