तरुण भारत

सागर शिक्षण महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

प्रतिनिधी / बेळगाव

सागर शिक्षण महाविद्यालयात (बी.एड) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रा. डी. एम. चव्हाण यांनी पूजन केले.

Advertisements

प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी प्रार्थना सादर केली. सूरज हत्तलगे, विद्याश्री पाटील, चैतन्या तिप्पाण्णाचे, मेघा एच. यांनी सुभाषबाबूंचा इतिहास कथन केला. प्रा. टी. एम. नौकुडकर व प्रा. एम. बी. नरसन्नवर यांची भाषणे झाली. संगीत प्रा. व्ही. एम. मोरे यांनी स्फूर्तीगीत सादर केले. प्राचार्य राजू हळब यांनी नेताजींच्या स्वातंत्र्यलढय़ातील विशेष योगदानाची माहिती दिली.

दुसऱया सत्रात सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित विशेष माहितीपट उपस्थितांना प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आला.

यावेळी सर्व प्राध्यापकवर्ग आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. वंदेमातरम्ने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Stories

शेतकऱयांना बियाणे-खतांचे वितरण वेळेत करा

Amit Kulkarni

पशुसंगोपनतर्फे मोफत गिरीराज कोंबडय़ांचे वाटप

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्रामपंचयतीमध्ये 54 उमेदवार रिंगणात

Patil_p

गुंजित रेल्वे कर्मचाऱ्याचा डोक्यात वार करून खून

Rohan_P

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

Abhijeet Shinde

बळ्ळारीमध्ये पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!