तरुण भारत

कोविड काळात केएलई हॉस्पिटलचे कार्य उत्कृष्ट

प्रतिनिधी / बेळगाव

कोविड काळात केएलई हॉस्पिटल परिवाराने उत्कृष्ट कार्य करून रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे मत हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.

Advertisements

हॉस्पिटलतर्फे आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाचा बेळगावमध्ये शिरकाव झाला तेव्हा हॉस्पिटलने त्वरित कोविड कक्ष सुरू केले. आजपर्यंत 35 हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून 2 हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. पीपीई कीट घालून रुग्णांवर उपचार करणे हे सोपे नव्हते. तरीही हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी हे काम करून दाखविले. याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडन्ट कर्नल स्वप्निल त्रीभुवन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ते म्हणाले, आम्ही माहीत असलेल्या शत्रुंशी लढतो. परंतु तुम्ही अज्ञात अशा विषाणूरुपी शत्रुशी लढत आहात. हे विशेष होय. यावेळी ‘मधुमेह वैद्य’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास केएलई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. एन. एस. महंतशेट्टी उपस्थित होते. डॉ. एम. व्ही. जाली यांनी स्वागत करून आभार मानले.

Related Stories

मोहरम-शहिदांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा महिना

Amit Kulkarni

येळ्ळूर येथे शर्यतीच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू

Patil_p

शहापूर खडेबाजार रस्त्याचे काम अर्धवटच

Patil_p

पडक्या घरात झोपेत असतानाच इसमाचा मृत्यू उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर

Omkar B

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

Patil_p

अबब सोमवारी तब्बल 17 कोटी 94 लाखाची दारू विक्री

Patil_p
error: Content is protected !!