तरुण भारत

खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी मोटारसायकलींचे वितरण

वार्ताहर / नंदगड

खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

यावेळी बोलताना आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, खानापूर शहरापासून तालुक्मयातील अनेक गावे खूप दूरवर वसली आहेत. शिवाय तालुक्मयाचा निम्म्याहून अधिक भाग डोंगराळ प्रदेशात मोडतो. तालुक्मयात शंभराहून अनेक दिव्यांग लोक आहेत. त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे ये-जा करण्यासाठी तीनचाकी मोटारसायकलींची गरज आहे. ही गरज ओळखून महिला व बालकल्याण खात्यांच्या अंतर्गत शासनाकडे शंभर मोटारसायकलींची मागणी केली होती. किमान पन्नास तरी मोटारसायकली मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. अखेर दोन वर्षात केवळ 15 सायकली उपलब्ध झाल्या आहेत. यापुढे जास्तीत जास्त मोटारसायकली मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
आहे, असे सांगितले. यावेळी तहसीलदार रेश्मा तलिकोटी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, नगरसेवक, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कोरोनाच्या धास्तीत ‘लगीन’घाई ठरतेय धोकादायक

Amit Kulkarni

मलप्रभा नदीवरील पूल बनला अपघाताचे ठिकाण

Amit Kulkarni

परिवहनच्या भंगाराची लवकरच होणार उचल

Patil_p

अन्यथा वीज बिल भरणार नाही!

Amit Kulkarni

बुधवारी बेळगावात पॉझिटिव्ह नाही

Patil_p

बेळगाव नावाबाबत महाराष्ट्र सरकारला पत्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!