तरुण भारत

कर्नाटकमध्ये बुधवारी ४२८ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमधील कोरोनाची नवीन प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. बुधवारी राज्यात ४२८ नव्याने लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली. दरम्यान बुधवारी राज्यात ७६० रूग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२९८ इतकी आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राज्यात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ४,०१२ आहे. बुधवारी जिल्ह्यात नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २२७ होती. तर जिल्ह्यात बुधवारी ४७८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: आतापर्यंत ७० हजाराहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण

Abhijeet Shinde

पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील

Abhijeet Shinde

कर्नाटक : कृषी संबंधित तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे

Abhijeet Shinde

कर्नाटकात नवीन ४१९ बाधितांची भर

Abhijeet Shinde

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ८३३ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कर्नाटकात गेल्या २४ तासात १,०६५ नवीन रुग्ण, तर २८ मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!