तरुण भारत

लोकमान्य सोसायटीतर्फे सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

लोकमान्य सोसायटी संचालित खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दल व सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांच्या लवकरच प्रशिक्षाणाला सुरुवात होणार आहे.

Advertisements

पूनम वैजनाथ मासेकर, तुकाराम ईश्वर हानबर (बीएसएफ), गुरुप्रसाद गावडा (मराठा इन्फंट्री), सचिन बेडरे (आर्टलरी), भिकू फोंडे (एमईजी, बेंगळूर) या विद्यार्थ्यांची सैन्य व सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. याबद्दल लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच प्राचार्या शरयू कदम यांनी के. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व प्रा. शंकर गावडा हे शिंदोळी ग्रा. पं. निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचाही किरण ठाकुर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रितम बिजलानी, विनायक जाधव आदी उपस्थित होते. 

Related Stories

हलगा रस्त्यावरील तात्पुरत्या भाजीमार्केटमध्ये गर्दी

Patil_p

जैन इलेव्हनकडे एमएसडी चषक

Patil_p

आनंदनगर-वडगाव येथे घरफोडी

Amit Kulkarni

उचगावमधील शिवपुतळय़ाच्या चौथऱयावर राजमुद्रा बसविण्याचा कार्यक्रम

Patil_p

संप परिवहन कर्मचाऱयांचा, फटका प्रवाशांना

Patil_p

चिकन उधारी दिले नाही म्हणून चाकूहल्ला

Patil_p
error: Content is protected !!