तरुण भारत

मासगौंडहट्टी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

उधारी न दिल्याने झाला होता खून : दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

उधारी दिली नाही म्हणून मनात राग धरून मासगौंडहट्टी येथील तरुणाने किराणा दुकानदाराचा खून केला होता. याप्रकरणी दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

यल्लाप्पा मारुती धामणेकर (वय 26, रा. मासगौंडहट्टी, ता. बेळगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. मयत महादेव मिनाजी मेलगे (वय 48) यांचे मासगौंडहट्टी येथे किराणा दुकान आहे. यल्लाप्पाने मयत महादेव यांच्याकडे किराणा माल उधारी मागितला. त्यावर त्यांनी नकार दिला. यापूर्वीची उधारी आहे ती परत दे, असे सांगितले. दि. 11 नोव्हेंबर 2018 रोजी एका वृद्धेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी यल्लाप्पा हा गाणी लावून नाचत होता. तेव्हा मयत महादेव यांनी हे योग्य नाही, ते बंद कर, असे सांगितले.

त्या रागातून आरोपी यल्लाप्पाने तू अधिकच करत आहेस, तुला सोडत नाही म्हणून घरातील लोखंडी रॉड घेऊन महादेव यांच्या डोक्मयावर वार केला. तो वार वर्मी लागला आणि महादेव मेलगे खाली कोसळले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी दि. 13 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये आरोपी यल्लाप्पा धामणेकर याच्यावर भा.दं.वि. 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Related Stories

दक्षिण मतदार संघात महिला आघाडीची स्थापना

Omkar B

कोरोनामुळे जिल्हय़ात तिघांचा मृत्यू

Amit Kulkarni

ग्रामीणला दिलासा, पण निपाणीत धास्तीच

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात साडेतीन हजार अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

वकिलांवरील हल्ल्यांविरोधात बार असोसिएशनचे निवेदन

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या हितासाठी दोन्ही मार्केट सुरू ठेवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!