तरुण भारत

CBSE दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जारी होणार : शिक्षणमंत्री

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


CBSE च्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी दिली. एका लाईव्ह शिक्षण सत्रादरम्यान विविध विषयांवर बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.


दरम्यान, CBSE ची परीक्षा कधी सुरु होणार आणि कधी संपणार याबाबतच विद्यार्थ्यांना माहिती आहे. मात्र कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा असेल यांची सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, लवकरच विद्यार्थ्यांना याबाबत सविस्तर माहिती मिळणार असल्याचे आज शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेवरून स्पष्ट झाले आहे.


ते म्हणाले, CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल. ही माहिती बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in यावर दिली जाईल. 


आजच्या लाईव्ह सेशनमध्ये रमेश पोखरियाल यांनी CBSE शाळांच्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुमारे एक हजार शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रमुखही यात सहभागी होते. यात चर्चेचा मुख्य मुद्दा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ग्राऊंड रुट लेवलला कसे लागू करावा याबद्दल बोलणे झाले.

Related Stories

जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर

Patil_p

लॉकडाऊनमध्ये कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटात

prashant_c

त्रालमध्ये चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

विकास दुबेच्या साथीदाराला चकमकीत कंठस्नान

Patil_p

अनुदानित शाळांमध्ये 11 हजार शिक्षकपदे रिक्त

Patil_p

गणतंत्रदिन संचलनात बांगलादेशची तुकडी

Patil_p
error: Content is protected !!