तरुण भारत

स्टेट बँकेवर दोन एमडींच्या नियुक्तीला मंजुरी

वृत्तसंस्था / मुंबई

सरकारने देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेत दोन नवीन व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) नियुक्तीकरीता मंजुरी दिली आहे. सध्या नियुक्ती होणारे अश्विनी तिवारी आणि स्वामिनाथन जानकी रमन अशी नावे असणारे दोघेही डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर (डीएमडी) म्हणून कार्यरत आहेत.

Advertisements

मागील वर्षातील ऑक्टोबरमध्ये बँक बोर्ड ब्यूरो (बीबीबी) यांनी दोन एमडी पदांसाठी मुलाखत घेतली होती. सदर मुलाखतीनंतर वरील दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. कॅबिनेटची नियुक्ती समिती (एसीसी) यांनी दोघांच्या नावाला हिरवा कंदील दिला असून दोघांची नियुक्ती आगामी तीन वर्षांसाठी करण्यात आल्याची माहिती आहे. स्टेट बँकेमध्ये एकूण चार एमडी आणि एक अध्यक्ष असतात. सध्या अध्यक्ष म्हणून दिनेश खारा हे कार्यरत आहेत.

सरकारी बँकांमध्ये अध्यक्षपदच नाही

सरकारी बँकांमध्ये काही वर्षापूर्वीपासून अध्यक्ष हे पदच नाही आहे. याऐवजी एमडी आणि सीईओ ही पदे तयार करण्यात आली होती. तरीदेखील अजूनही एसबीआयमध्ये अध्यक्ष आणि एमडी ही पदे कार्यरत आहेत. अन्य सरकारी बँकांमध्ये एक एमडी, सीईओ आणि अन्य कार्यकारी संचालक पदे कार्यरत असल्याची माहिती आहे.

Related Stories

मॅप माय इंडियाचा येणार आयपीओ

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि.1 जानेवारी 2022

Patil_p

ब्रेनलीची ८० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

datta jadhav

गौतम अदानी यांच्या उत्पन्नात 183 टक्के वाढ

Patil_p

मुथुट फायनान्सचा नफा 59 टक्के वाढला

Patil_p

भारतीय सेवा क्षेत्र ऑगस्टमध्ये तेजीत

Patil_p
error: Content is protected !!