तरुण भारत

कराडमध्ये सर्वच रस्त्यांवर सम-विषम पार्किंगचा विचार

प्रतिनिधी / कराड

कराड शहरात वाहतुकीची कोंडी वाढत चालल्याने शहरात सर्वच रस्त्यांवर सम-विषम तारखेला पार्किंग करण्यात यावे, याबाबत पालिका स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विशेष सभेत सर्वच नगरसेवकांनी याबाबत एकमुखी मागणी करत पोलीस आणि नगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.

Advertisements

नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी, नियोजन समितीच्या माध्यमातून लाहोटी कन्या प्रशाला ते सोमवार पेठ हाटकेश्वर मंदिरमार्गे कृष्णा घाटावर जाणाऱया रस्त्यावर सम विषम तारखेस पार्किंगचा प्रस्ताव मांडला होता. हा विषय विशेष सभेत मांडल्यानंतर नगरसेवकांनी यात आणखी रस्ते घेण्याच्या सूचना केल्या. चार चाकी वाहने अंतर्गत रस्त्यांवर दोन्ही बाजूला पार्क केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. हेड पोस्ट, आझाद चौक ते सातशहीद चौक ते कृष्णा घाट यासह अन्य रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर सम विषम तारखेस पार्किंगचा नियम लागू करावा. याबाबत चर्चा करण्यासाठी नगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या बैठकीचे आयोजन तातडीने करावे. नागरिकांना माहिती होण्यासाठी जाहीर प्रकटन द्यावे, अशा स्वरूपाची चर्चा या सभेत करण्यात आली.

शहरात वाहनांची संख्या जास्त असून केवळ बाजारपेठेतील रस्त्यांवर सम विषम तारखेस पार्किंग होते. अंतर्गत रस्त्यांवर हा नियम नाही. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. रात्रीच्या वेळी अनेक गल्ल्यांमध्ये पाण्याची गाडी, पोलीस गाडी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सम विषम तारखेस सर्वच रस्त्यांवर पार्किंग केले तर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बंद वाहनांना प्रत्येकी 500 रूपये दंड

शहरात बंद अवस्थेत लावण्यात आलेली वाहने पालिकेने जप्त करावीत. याबरोबरच या वाहनांच्या मालकांना दिवसाला 500 रूपयेप्रमाणे दंड आकारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सुपर मार्केटमधील त्या दुकानांकडून जागा वापर भाडे घ्या

सुपर मार्केटमध्ये जुन्या दुचाकी विक्रीची दुकाने आहेत. मात्र येथे ही वाहने नगरपालिका मालकीच्या जागेवर लावली जातात. यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या दुकानमालकांकडून जागा वापर भाडे वसूल करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

Related Stories

सातारा : डोंगरावरची मोगरवाडी शाळा स्वातंत्रदिनी झाली टॅबयुक्त शाळा

Abhijeet Shinde

1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार; राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता

Abhijeet Shinde

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर राडा

datta jadhav

नागठाणेत शौचालयातील मैला थेट ओढ्यात, कारवाईची मागणी

Abhijeet Shinde

शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक अकोट-अकोला येथे होणार

Abhijeet Shinde

सातारा : भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!