तरुण भारत

कोगनोळी अंबिका मंदिरात बनशंकरी उत्सव

कोगनोळी : येथील ग्रामदैवत अंबिका मंदिरामध्ये बनशंकरी उत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दि. 21 रोजी अंबिका मंदिरात चिका पाटील, मानकू पाटील, भिवाजी पाटील, हरी पाटील, रानबा पाटील या मानकऱयांच्या हस्ते देवीला अभिषेक घालण्यात आला. अंबिका देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या सप्ताहात दररोज नित्यनेमाने सकाळी मूर्तीला अभिषेक, विधिवत पूजन, सकाळी 7 व रात्री 8 वाजता पालखी सबिणा तसेच देवीची आरती असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री गावातील विविध भजनी मंडळींचा हरिजागराचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार दि. 27 रोजी सकाळी देवीला अभिषेक व विधिवत पूजा झाल्यावर सी. के. पाटील यांच्या घरातून आणलेली मानाची ओटी भरण्यात आली. अंबिका भक्त मंडळ व मानकऱयांच्या उपस्थितीत माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दुपारी 12 वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बनशंकरी उत्सवाची सांगता करण्यात आली.

Related Stories

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार

Patil_p

खानापूरात बुधवारी सहाजण पॉझिटिव्ह – खानापूर बस आगारात एकाला लागण

Rohan_P

लॉकडाऊन काळात पशुधनाची अविरत सेवा

Amit Kulkarni

पावसामुळे येळ्ळूर येथे घर कोसळले

Amit Kulkarni

मनपा कर्मचाऱयांच्या लसीकरणास प्रारंभ

Amit Kulkarni

शहरातील पोलिसांना बढती योग

Amit Kulkarni
error: Content is protected !!