तरुण भारत

कोरोनाचा इंडिगोला बसला फटका

नवी दिल्ली

हवाई उद्योगात नाव कमावलेल्या इंडिगोला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. तिसऱया तिमाहीअखेर जाहीर झालेल्या निकालात इंडिगोला तब्बल 620 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. विमान वाहतुकीवर होणारा परिणाम कंपनीसाठी नुकसानीचा ठरतो आहे. याउलट मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 496 कोटींचा नफा कमावला होता. तिसऱया तिमाहीत कंपनीने विमानातील प्रवाशांची मर्यादीत संख्या 40 टक्के इतकीच ठेवली होती. कमी प्रवाशांच्या संख्येचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर जाणवला आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न 5 हजार 142 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात 50 टक्के इतकी घट दिसली आहे.

Advertisements

Related Stories

टाटा मोटर्सकडून 21 नवीन व्यावसायिक वाहनांचे अनावरण

Patil_p

एचसीएलकडून 20 हजार जणांची भरती

Patil_p

एडीक्युची बायजूमध्ये गुंतवणूक

Patil_p

‘टाटा केमिकल्स’मधील हिस्सेदारी ‘टाटा सन्स’ने वाढवली

Patil_p

माहगाईचा उच्चांक

Omkar B

2026 पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर जेफ बेजोस?

Patil_p
error: Content is protected !!