तरुण भारत

सर्वेक्षण अहवालानंतर बाजार कोसळला

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन – सेन्सेक्स 588 अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात झालेल्या व्यापक विक्रीच्या दबावामुळे सलग सहावी घसरण नोंदवण्यात आली आहे. प्रमुख कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 588 अंकांनी प्रभावीत झाला असून दुसऱया बाजूला निफ्टीमध्ये 183 अंकांनी घसरण होत बंद झाला आहे. मोठय़ा प्रमाणात झालेल्या उलथापालथीमुळे सत्रातील दोन प्रमुख निर्देशांक तेजी आणि नुकसानीसोबत चढउतारासह बाजार बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण 2020-21 चे सादरीकरण केले आहे. सदरचा अहवाल हा मुख्य अर्थसंकल्प सादरीकरणा अगोदर सादर केले जाते. पेंद्रीय अर्थसंकल्प हा येत्या सोमवारी सादर होणार असल्याने याकडे उद्योगसह आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले असून याचा काहीसा प्रभाव गुंतवणूकदारांवर पडल्याने बाजार घसरणीत राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या जोरावर दिवसअखेर सेन्सेक्स 588.59 अंकांनी प्रभावीत होत 1.26 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 46,285.77 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 182.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 13,634.60 वर बंद झाला आहे. आतापर्यंत मागील सहा सत्रांमध्ये सेन्सेक्स  3,506.35 अंकांनी घसरला आहे. दुसरीकडे गेल्या सहा दिवसात एनएसई 1,010.10 अंकांनी नुकसानीत राहिला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये 26 समभाग हे घसरणीत राहिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शुक्रवारी डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, बजाज ऑटो, इन्फोसिस, टीसीएस आणि बजाज फिनसर्व्ह नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे मात्र इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक तेजीसोबत बंद झाले आहेत.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर दबाव

अभ्यासकांच्या माहितीनुसार मुख्य स्वरुपात सादर करण्यात येणाऱया केंद्रीय अर्थसंकल्प आणि महत्वपूर्ण घटनाक्रमांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात नफा कमाईचा सूर राहिला आहे. याचा नकारात्मक परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारात सलगची घसरण राहिल्याचे दिसून आले. उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलियोमधील गुंतवणूकदारांनी 3,712.51 कोटी रुपयाच्या निव्वळ समभागांची विक्री झाली आहे.

Related Stories

टाटा ग्रुपचा व्यवहार महिन्याअखेर पूर्ण होणार

Patil_p

आयटी कंपनी निर्यात 4.21 लाख कोटीवर

Patil_p

एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

जेएसडब्ल्यू 1 लाख कोटी गुंतवणार

Patil_p

हिंदुस्थान युनिलिव्हरचा नफा वाढला

Patil_p

आयटी कंपन्यांकडून 1 लाख जणांची होणार भरती

Patil_p
error: Content is protected !!