तरुण भारत

तामिळनाडू अंतिम फेरीत दाखल

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

के. बी. अरुण कार्तिकच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या सईद मुस्ताक अली करंडक टी-20 लिग स्पर्धेत तामिळनाडूने राजस्थानचा उपांत्य सामन्यात 7 गडय़ांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात अरुण कार्तिकने नाबाद 89 धावांची खेळी केली.

Advertisements

या सामन्यात राजस्थान संघाने 20 षटकात 9 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडूने 3 बाद 158 धावा जमवित हा सामना 7 गडय़ांनी जिंकला. राजस्थानच्या डावात अशोक मेनारियाने 51 तर अर्जित गुप्ताने 45 धावांचे योगदान दिले. तामिळनाडूतर्फे एम. मोहम्मदने 24 धावांत 4 तर साईकिशोरने 16 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडू संघातील अरुण कार्तिकने नाबाद 89 धावा तर नारायण जगदीशनने 28 धावा जमविल्या. राजस्थानतर्फे तन्वीर उल हकने तसेच अनिकेत चौधरीने प्रत्येकी 1 बळी मिळविला.

येथील सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा कर्णधार अशोक मिनारियाने 32 चेंडूत 51 धावा झोडपल्या. पहिल्याच षटकात सलामीचा भरत शर्मा खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. आदित्य गढवालने 29 धावा जमविल्या. तामिळनाडूचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. त्यांनी राजस्थानला तीन जीवदाने दिली. पण साईकिशोरने मेनारिया आणि महिपाल यांना बाद करून राजस्थानवर दडपण आणले. राजस्थानची स्थिती यावेळी 4 बाद 129 अशी होती. एम. मोहम्मदने आपल्या अचूक गोलंदाजीवर राजस्थानचे 4 गडी बाद केले. शेवटच्या पाच षटकात राजस्थानला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. त्यांचे शेवटचे पाच गडी 24 धावांत तंबूत परतले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडूच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. सलामीचा हरिनिशाण हा केवळ 4, त्यानंतर बाबा अपराजित 2 धावांवर तंबूत परतला. तामिळनाडूची स्थिती यावेळी 2 बाद 17 अशी होती. दरम्यान, नारायण जगदीशन आणि अरुण कार्तिक यांनी तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या बिश्नोईने जगदीशनला 28 धावांवर बाद केले. तामिळनाडूचा तिसरा गडी संघाची धावसंख्या 69 असताना बाद झाला. अरुण कार्तिक आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी भक्कम फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अरुण कार्तिकने आपल्या नाबाद 89 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. अरुण कार्तिकने विजयी चौकार मारून राजस्थानचे आव्हान संपुष्टात आणले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान- 20 षटकात 9 बाद 154 (अशोक मेनारिया 51, अर्जित गुप्ता 45, एम. मोहम्मद 4/24, साईकिशोर 2/16), तामिळनाडू- 3 बाद 158 (अरुण कार्तिक नाबाद 89, नारायण जगदीशन 28, दिनेश कार्तिक नाबाद 26, तन्वीर उल हक 1/22, अनिकेत चौधरी 1/29).

Related Stories

बोपण्णा-कुरेशी एका स्पर्धेसाठी पुन्हा एकत्र खेळणार

Patil_p

होय! 9 बॅट घेऊन ‘तो’ आयपीएल खेळतोय!

Patil_p

कोहलीला शेवटच्या दोन कसोटी हुकणार

Patil_p

मध्यवर्ती करार श्रेणीत काईल जेमिसनची वर्णी

Patil_p

भारताचा हॉलंडवर 5-2 ने विजय

Patil_p

टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताकडून अधिक पदकांची आशा : दीपा मलिक

Patil_p
error: Content is protected !!