तरुण भारत

‘जखमी’ न होणारे बकरे

प्रत्येक सजीवाला त्याच्या संरक्षणासाठी कोणते ना कोणते शस्त्र निसर्गतःच मिळालेले आहे. बकऱयांना त्यांच्या संरक्षणासाठी कठीण अशा शिंगांचा लाभ झाला आहे. जेव्हा बकरे एकमेकांत लढतात, तेव्हा एकमेकांवर शिंगांचा वार करतात. या लढाईत अनेकदा त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. काहीवेळा जखम खोल असेल तर त्यांचा मृत्यूही होतो. ही लढाई कोणी थांबवू शकत नाही.

उत्तर प्रदेशातील एका शेतकऱयाने यावर नामी शक्कल शोधून काढली आहे. त्याने त्याच्या बकऱयांच्या शिंगांना प्लॅस्टीकचे मऊ आवरण घातले आहे. त्यामुळे बकरे एकमेकांमध्ये कितीही भांडले आणि झगडले आणि त्यांनी शिंगांनी एकमेकांना मारले तरी कोणीही जखमी होत नाही. सध्या हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून तो लाखो लोकांनी पाहिला आहे. शेतकऱयाच्या या युक्तीमुळे बकऱयांची भांडण्याची हौसही भागते आणि ते जखमीही होत नाहीत. त्यामुळे शेतकऱयाला त्यांची मारामारी सोडविण्यासाठी मधे पडावे लागत नाही. एकंदर, हा उपाय शेतकरी आणि त्याचे बकरे व बकऱया यांच्यासाठी उपयोगी ठरला आहे.

Advertisements

Related Stories

बाहुबली हरिशंकर तिवारींच्या कुटुंबाचा सपप्रवेश

Patil_p

हिंसक निदर्शनांमागे देशविरोधी शक्ती!

Patil_p

ममता बॅनर्जींचा पाय झाला बरा

Patil_p

तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता ;सहकारी महिलेने केला होता लैंगिक अत्याचाराचा आरोप

Abhijeet Shinde

मराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक

Sumit Tambekar

जी-7 बैठकीला मोदींची अनुपस्थिती

Patil_p
error: Content is protected !!