तरुण भारत

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

प्रतिनिधी/ सातारा

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील तात्या टोपे स्टेडियम येथे चालू असलेल्या 18 व्या फेडरेशन चषक कनिष्ठ मैदानी स्पर्धेत मांढरदेव येथील सुशांत जेधे याने 10000 मीटर धावणे स्पर्धेत रौप्यपदक मिळवून महाराष्ट्राला पदकांचे खाते उघडून दिले. 10000 मीटर धावणे या खेळ प्रकाराने फेडरेशन चषकात सुरूवात झाली. सुशांतने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना 31.22 मिनिटे वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर इतर 25 राज्यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

वेलंग (ता. वाई) येथील रहिवासी असणारा सुशांत हा वाई येथील किसनवीर कॉलेजमध्ये 12 वी इयत्तेत शिकत आहे. मांढरदेव येथील मांढरदेवी ऍथलेटिक्स फौंडेशनमध्ये तो सराव करतो. त्याला क्रीडा मार्गदर्शक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुशांतच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, मांढरदेव ग्रामस्थ, दुकानदार व सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

स्थानिक गुन्हे शाखेचा डबल धमाका

Patil_p

कुरुंदवाड शहरात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा : महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये ५६ गावांचा समावेश

Abhijeet Shinde

गोकुळची दूध खरेदी दरात कपात

Abhijeet Shinde

सोलापुरात आतापर्यंत 210 जण कोरोनामुक्त होवून घरी

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी लवकरच घेणार पंतप्रधानांची भेट – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!