तरुण भारत

आपने वीज आंदोलनाद्वारे प्रत्येक गोंयंकराच्या हृदयाला स्पर्श केला

आपचे राहुल म्हांबरे यांचे प्रतिपादन

पणजी / प्रतिनिधी

Advertisements

आम आदमी पार्टीने सुरू केलेले वीज आंदोलन हे एक मोठे यश असल्याचे दिसून येत आहे, ज्यात मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होत असताना, दिल्लीकरांना ज्या सेवा मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात असे म्हणत लोक पक्षात सामील देखील होत आहेत, असे प्रतिपादन आपचे प्रवक्ते राहुल म्हांबरे यांनी केले आहे.

आप दररोज पाच ते आठ सभा आयोजित करत आहेत व मोठय़ा संख्येने लोक या सभेमध्ये भाग घेतातच, परंतु त्यांना मिळणाऱया वाढीव वीज बिलांवरही बोलतात आणि बैठकीत सोबत बिलेदेखील घेऊन येतात.

आपचे सरकार दिल्लीतल्या जनतेसाठी काय करत आहेत हे सांगण्याबरोबरच, या बैठकीतील वक्ते गोव्यातील भाजप सरकारने जबरदस्तीने लादलेल्या प्रकल्पांवर प्रकाश टाकत आहेत, असे म्हांबरे पुढे म्हणाले.

गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल लोक अतिशय उघडपणे आपली निराशा व्यक्त करतात आणि त्यांनी आपले जीवन सुलभ करण्यासाठी काँग्रेसला बदलून भाजपला आणले याबद्दल शोक व्यक्त करतात कारण सध्याचे सरकार सर्वात वाईट असल्याचे सिद्ध होत आहे.

वीज आंदोलन कार्यक्रमात एक हजाराहून अधिक लोक आपमध्ये सामील झाले आहेत, हे उघड करताना राहुल म्हणाले की,पक्षात विविध सामाजिक-आर्थिक स्थिती, जाती आणि धर्मातील लोक सामील होत आहेत,यावरून गोव्यात आपने सर्व प्रकारच्या लोकांना पक्षात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले आहे,हे दिसून येते.

“आता हे स्पष्ट झाले आहे की, गोव्यातील पुढची विधानसभा निवडणुक ही भाजप आणि आप यांच्यात होणार आहे कारण कांग्रेसचा पूर्ण नाश झाला आहे आणि त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे आणि कांग्रेसला मतदान करणे म्हणजेच भाजपला मतदान करण्यासारखे आहे कारण निवडून आल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सामील होतात “राहुल म्हणाले.

आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी राहुल यांनी इंडिया अहेडने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ दिला, ज्यात असे दिसून येते की गोव्यात कांग्रेसचा संपूर्ण नाश झाला आहे आणि भाजपाचा आलेख खाली येत असताना आपचा आलेख वाढत आहे. “आप गोव्यात आपली संघटना उभारणी व बळकटी करणाच्या प्रक्रियेत असून विविध मतदारसंघात बूथस्तरीय समित्या स्थापण्याचे काम आता त्यांनी हाती घेतले आहे,” असे राहुल म्हणाले. या बूथ समित्या आता प्रभागातील मतदारांशी संपर्क साधतील,राहुल म्हणाले.

Related Stories

जागा निश्चित झाल्यावर आंबेडकरभवन उभारणार

Amit Kulkarni

प्रलंबित मागण्या त्वरीत पूर्ण करा

Amit Kulkarni

काँग्रेसचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे निधन

Omkar B

दोडामार्ग चेकनाक्मयावरील सर्व अडथळे हटविले.

Patil_p

तृणमूल-मगो युतीची युवाशक्ती क्रेडिट कार्ड योजना

Amit Kulkarni

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी राजकारण नको – संतोष मळीक

Amit Kulkarni
error: Content is protected !!