तरुण भारत

मडगाव पालिका कामगारांकडून झाडांचा कचरा जाळण्याचे प्रकार

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव पालिका एकीकडे कचरा समस्या सोडविण्यासाठी बायोमिथेनेशन प्रकल्प उभारून दैनंदिन कचरा हाताळण्याची योजना आखत असले, तरी दुसऱया बाजूने पालिका कामगार झाडांशी संबंधित कचरा कसा हाताळावा व त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी यासंदर्भात अनभिज्ञ असून त्यामुळे अशा प्रकारच्या कचऱयाला थेट आग लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. झाडांची पाने तसेच अन्य कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने कामगारांना असा कचरा जाळण्यासाठी अधिकाऱयांनी संमतीच दिल्याचे कचऱयाला आग लावण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे दिसून येत आहे.

Advertisements

कचरा उचल कामात गुंतलेले कामगार कचऱयाला आग लावत असले, तरी आतापर्यंतचे मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी त्यावर आवश्यक कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. कागद आणि अन्य सुका कचरा रस्त्यांच्या कडेला वा पदपथांवर झाडू मारून साफ करणारे सफाई कामगार असा कचरा गोळा झाल्यानंतर आडोशाला नेऊन आग लावत असल्याचे कित्येकदा आढळून आले आहे.

कचरा जाळण्यास हरित लवादाची बंदी असली, तरी पालिका अधिकाऱयांनी कामगारांना सदर आग लावण्यास एक प्रकारे संमती दिल्याचे दिसून येत आहे आणि या आग लावण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याच्या शक्मयता वाढली आहे. अधिकाऱयांनी झाडांशी संबंधित व अन्य सुका कचरा जाळला जाऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविताना अन्य प्रकारे या कचऱयाची विल्हेवाट लावण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली. गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे (जीडब्ल्यूएमसी) व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टीन्स यांचे अशा प्रकारे कचरा जाळण्याच्या प्रकारांकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कचरा जाळण्याच्या पद्धतीवर बंदी आहे आणि हे सरळ नियमांचे उल्लंघन आहे.

Related Stories

मला निवडणूक आयोगाची नोटीस अयोग्य : म्हांबरे

Sumit Tambekar

बाधितांची संख्या आज होणार 10 हजार पार

Patil_p

मडगावच्या न्यू मार्केटवरून नाटय़मय घडामोडी

Omkar B

पुराबाबात उपाययोजना करा अन्यथा म्हादई काठावरील कृषिक्षेत्र धोक्यात

Amit Kulkarni

मेस्तावाडा वास्कोत घरावर माड कोसळून हानी

Amit Kulkarni

बारावीचा निकाल 99.40 टक्के

Amit Kulkarni
error: Content is protected !!