तरुण भारत

28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली जुन्या बसपासची मुदत

प्रतिनिधी / बेळगाव

शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासची प्रक्रिया गतिमान झाली आहे. मात्र, ऑनलाईन बसपास प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. महिन्याभरात केवळ 10,857 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बसपास मिळविले आहेत. मात्र अद्याप बरेच विद्यार्थी बसपासपासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत पुन्हा 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गांतून समाधान क्यक्त होत आहे.

Advertisements

विद्यार्थ्यांना बसपास मिळवायचा असल्यास सेवा सिंधू संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून अर्ज केलेली पावती बसपास विभागात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून बसपास उपलब्ध होणार आहे.  ही प्रक्रिया थोडी किचकट व वेळ काढू असल्याने अधिक वेळ लागत आहे. 

दरम्यान जुन्या बसपासची मुदत 31 जानेवारी रोजी संपणार होती. मात्र परिवहनने जुन्या बसपासची मुदत तिसऱयांदा वाढवून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील शुल्क पावती, आधारकार्ड व मागील वर्षी वितरित केलेले पास दाखवून प्रवास करता येणार आहे.

Related Stories

चन्नम्मा चौकात वाहतुकीची कोंडी

Patil_p

नाव नाही ते गाव, कर्नाटक सरकारचा अजब कारभार

Rohan_P

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून भाजी मार्केटला प्रारंभ

Omkar B

अंकलीत मदतनिधीचे वितरण

Patil_p

काकती शिवारात विद्युत खांब धोकादायक

Amit Kulkarni

बुधवारी जिल्हय़ात 830 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!