तरुण भारत

भ्रष्टाचार प्रकरणी चिनी बँकरला मृत्युदंड, घेतली होती 2019 कोटींची लाच

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर 1.8 बिलियन युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 2019 कोटी 53 लाखांची लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाला. त्यानंतर शुक्रवारी उत्तरेतील तिआनजीन शहरामध्ये त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. 

Advertisements

ली शिऑमीन असे मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चीनमधील सर्वात मोठी व्यवस्थापन संस्था असलेल्या हुआरोंगचे अध्यक्ष होते. त्यांनी स्वीकारलेल्या लाचेची रक्कम खूपच मोठी होती. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. शिऑमीन यांनी शिक्षेसंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालायने फेटाळून लावली होती.

Related Stories

डोक्यापासून पायापर्यंत केवळ ’टॅटू’च

Patil_p

संक्रमणाच्या दुसऱया लाटेने फ्रान्स-ब्रिटन त्रस्त

Patil_p

दक्षिण आफ्रिकेत ड्रायव्हिंग सर्वात धोकादायक

Patil_p

कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav

‘बीबीसी’च्या प्रसारणावर चीनमध्ये बंदी

datta jadhav

चॅपर विषाणूने भीती वाढविली

Omkar B
error: Content is protected !!