तरुण भारत

मिरज शासकीय रूग्णालयातील बाह्य व आंतर रूग्ण विभाग ‘या’ तारखेला होणार सुरू

प्रतिनिधी / मिरज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज हे दिनांक 28 मार्च 2020 पासून कोविड रूग्णालय म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत घोषित करण्यात आले होते. या रूग्णालयामध्ये आजपर्यंत फक्त कोविड बाधित व संशयित रूग्णांनाच सेवा देण्यात येत होती. सोमवार 1 फेब्रुवारी 2021 पासून शासकीय वैद्यकीय रूग्णालयात आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू होणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षित यांनी दिली.

शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, कान, नाक, घसाशास्त्र या पाच विभागांचे बाह्यरूग्ण व आंतररूग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत. सद्य: परिस्थिती लक्षात घेता, कोविड बाधित, संशयित रूग्णांची संख्या बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांच्या सुचनेनुसार व त्याचप्रमाणे सर्व सामान्य जनतेकडून होणारी विचारणा आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व त्यांनी केलेली मागणी लक्षात घेता, या रूग्णालयामध्ये काही खाटा कोविड बाधित अथवा संशयित रूग्णांसाठी आरक्षित करून बाकी सर्व खाटा कोविड व्यतिरिक्त इतर सर्व सामान्य आजाराच्या रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव रूग्णालयीन प्रशासनाच्या विचाराधीन होता.

Advertisements

या संदर्भात प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून वरील पाच विभागांचे बाह्यरूग्ण व आंतररूग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. दिक्षित यांनी सांगितले.

Related Stories

सांगली : जमीन खरेदी व्यवहारात कापड व्यवसायिकाची फसवणूक

Abhijeet Shinde

मिरज-कृष्णाघाट उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु होणार

Abhijeet Shinde

सांगली : मतदार राजा उन्हात, राज्यमंत्री संतापले

Abhijeet Shinde

सांगली : चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने २ पूल पाण्याखाली

Abhijeet Shinde

सांगली : मिरज पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ, आठवडाभरात तिसरी घरफोडी

Abhijeet Shinde

सांगली : आमणापूर पुलावरील पाणी ओसरले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!