तरुण भारत

सातवेत ऊसाचा फड पेटवताना शेतकऱ्याचा मृत्यू

वारणानगर / प्रतिनिधी

सातवे ता. पन्हाळा येथील सातवे – सावर्डे रस्त्या कडेला असणाऱ्या शिवचा ओढा या शेतात ऊसाचा पाला पेटवत असताना ऊसाच्या खोडव्यामध्ये पाय अडकून जाळात पडलेल्या सखाराम कृष्णात मरगाळे वय ८० यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये मरगाळे हे नव्वद टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. काही तासात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मरगाळे हे जाळात पडल्यावर रस्त्याने खेळायला जाणाऱ्या मुलांनी जिवाची तमा न बाळगता त्यांना त्यातून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने पाठवले तसेच आग विझवली मुलांच्या या साहसा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

Related Stories

पन्हाळा तालुक्यातील देवाळेत २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : यशवंतचे कोविड समर्पित रुग्णालय पन्हाळ्यासाठी वरदान – आरोग्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या सवलतीकडे दुर्लक्ष, व्यापाऱयांचा पुळका

Abhijeet Shinde

दोनवडेनजीक मोटरसायकल अपघातात एक ठार, एक जखमी

Abhijeet Shinde

सुगंधी तंबाखू साठाप्रकरणी शिरोळ उपनगराध्यक्ष मानेवर पोलिस कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!