तरुण भारत

कोरोनापेक्षा अधिक घातक असणार भविष्यातील महामारी

वृत्तसंस्था/ बर्लिन

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भविष्यातील महामारीसंबंधी इशारा दिला आहे. भविष्यात येणाऱया महामारी सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा 10 पट अधिक घातक असतील. सर्व देशांनी कोरोना विषाणू महामारीपासून धडा घ्यावा, असे गेट्स यांनी म्हटले आहे.

जग पुढील महामारीसाठी तयार नाही. संभाव्य नव्या आजारांपासून लोकांना वाचविण्याचे आवाहन जगभरातील सरकारांना करतो. कोरोना महामारी घातक आहे, पण भविष्यातील महामारी 10 पट अधिक गंभीर असू शकतात. कोरोना महामारी 5 वर्षांपूर्वी आली असती तर जग इतक्या लवकर लस तयार करू शकले नसते असे गेट्स यांनी जर्मन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

लस राष्ट्रवाद

कोविड लस तयार करण्यात सहकार्य करणाऱया वैज्ञानिक आणि संघटनांचे गेट्स यांनी कौतुक केले आहे.  याचबरोबर जागतिक नेत्यांना त्यांनी लस राष्ट्रवादापासून वाचण्याचे आवाहनही केले आहे. सर्वांनी लसीच्या योग्य वितरणात सहकार्य करावे असे गेट्स म्हणाले. एखादा देश केवळ स्वतःच्या नागरिकांकरिता लसीचे डोस राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला लस राष्ट्रवादाचे नाव दिले जाते.

Related Stories

व्हॅलेंटाईन गिफ्ट, पतीला धक्का

Patil_p

चिली : रुग्णांमध्ये घट

Patil_p

निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ज्यो बिडेन आघाडीवर

Patil_p

अमेरिकेत 5 लाख भारतीयांना मिळणार नागरिकत्व

datta jadhav

इस्रायल : एक-पंचमांश लोकसंख्येचे लसीकरण

Patil_p

बहरीनमध्ये बुरखाधारी महिलेकडून गणेशमूर्तींची तोडफोड

datta jadhav
error: Content is protected !!