तरुण भारत

राज्याचा अर्थसंकल्पही आता ‘पेपरलेस’

आमदारांना पेन ड्राइव्हमधून मिळणार पुस्तिका

प्रतिनिधी / मुंबई

Advertisements

पेंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने सन 2021 -22 या वर्षांपासून अर्थसंकल्पीय प्रकाशने ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षांपासून जवळपास  एक लाख पानांची 92 अर्थसंकल्पीय पुस्तिकांची छपाई होणार नाही. त्यामुळे या कागद आणि छपाईचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

विधिमंडळ सदस्यांना अर्थसंकल्पीय प्रकाशनाच्या प्रती लगेज बॅगमध्ये पेन ड्राईव्हमधून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी वित्त विभागाने 842 लगेज बॅगा टेंडरद्वारे खरेदी करण्यास आणि त्यासाठी लागणार्या 58 कोटी 82 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. वित्त विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

कोरोना संकटामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम झाला आहे. निधीची चणचण असल्याने सरकारने काटकसर आणि खर्च कपातीवर भर दिला आहे. पेंद्र सरकारनेही या वर्षांपासून अर्थसंकल्पाची छापील प्रकाशने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेंद्राच्या या निर्णयाचे राज्य सरकारने अनुकरण केले आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सन 2021ल्ल्22 या वर्षांचा अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तासाभरात अर्थसंकल्पीय प्रकाशने राज्य सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती वित्त विभागाच्या सूत्रांनी दिली. अर्थमंर्त्यांनी सूचना केल्यास त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची छापील प्रत आमदार, विभाग, माध्यमांचे प्रतिनिधी यांना उपलब्ध करून दिली जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

वेध अर्थसंकल्पाचे.

-या वर्षांपासून छापील अर्थसंकल्पीय प्रकाशने देणे बंद

– अर्थसंकल्पीय प्रकाशने सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार

Related Stories

दिल्लीत 106 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

pradnya p

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील: चंद्रकांत पाटील

triratna

शरद पवारांना ‘आयकर’ विभागाची नोटीस

pradnya p

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांचा फोन आला; यड्रावकरांचा खुलासा

Shankar_P

आमदार सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर दूध दरासाठी आंदोलन

triratna

… तर महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन लावले जाईल; मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

pradnya p
error: Content is protected !!