तरुण भारत

छोटय़ा पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

आपल्या समाजात अनेक लोक राहात असतात पण याच समाजात काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात त्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्टीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं.

आता हि मालीका एका वेगळ्यावळणावर आली आहे कारण विश्वजित चंद्रा आणि रेवती बोरकर समोरासमोर येणार आहेत. विश्वजित हा दुसरा तिसरा कोणी नसून रेवती बोरकरचा नवरा आहे. अत्यंत श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून त्याची समाजात एक ओळख आहे. ही भूमिका दिग्दर्शक संजय जाधव साकारणार आहेत. संजनाच्या मदतीने सिद्धांत छायाचे वडील लोकांपुढे आर्थिक मदतीची याचना करतात. ज्यातून पाच लाख जमा होतात. हवालदार ढवळे राजनला त्याच्या अटकेची रेवती तयारी करतेय हे सांगतो. मिळालेल्या माहितीमुळे राजन सावध होतो आणि संजनाच्या घरी जाऊन संजनाला धमकावतो. संजनाच्या घरी काम करणारी करीना हे पाहून घाबरते. ढवळे राजनला बातम्या पोहोचवतायेत हे करीना रेवतीला फोन करुन कळवते. राजन स्वतः साठी शहरातील सर्वोत्तम वकील म्हणून विश्वजीतशी बोलणी करतो. काय घडणार जेव्हा न्यायप्रिय रेवती आणि कायदेतज्ञ विश्वजित समोरासमोर येणार, ह्या मफत्यूमागचे गूढसत्य समोर येईल? हे येत्या भागांमध्ये कळणार आहे. ही मालिका गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता फक्त झी मराठीवर प्रसारित होते.

Advertisements

Related Stories

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मध्ये तेजस बर्वेची एन्ट्री

Omkar B

उपेंद्र लिमये झाले गायक संगीतकार

Patil_p

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात गुन्हा

Abhijeet Shinde

अभिनेता सलमान खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव!

Rohan_P

दक्षिणेतील मराठमोळा सुपरस्टार

Amit Kulkarni

अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल; अटकेची टांगती तलवार

Rohan_P
error: Content is protected !!