तरुण भारत

रमेश वंसकर यांचा दुसऱयांदा दणणदणीत विजय

सुरेश नाईक पॅनलचा दारुण पराभव,एकही उमेदवार जिंकला नाही

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या कार्यकारिणीसाठी काल रविवार 31 जानेवारी 2021 झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रमेश वंसकर यांच्यासह त्यांचे पॅनल विजयी ठरले आहे. वंसकर यांनी सलग दुसऱयांदा विजय प्राप्त करत माजी अध्यक्ष सुरेश नाईक यांचा दारुण पराभव केला.

 काल रविवारी दु. 3 ते सायं. 6 वाजेपर्यंत मतदान झाले. याच वेळेत झालेल्या आमसभेत मंडळाच्या आर्थिक अहवालावरुन शाब्दिक बाचाबाची झाली. यामध्ये सुरेश नाईक, धर्मा चोडणकर, राजू भि. नाईक, विठ्ठल गावस, नारायण महाले, दशरथ परब , शंभूभाऊ बांदेकर यांनी महत्वाच्या सूचना केल्या. अध्यक्ष रमेश वंसकर यांनी त्या मान्य करुन उगाच निष्क्रिय ठरलेल्या कुणी भाषणबाजी करु नये, असे सांगितल्यानंतर वातावरण तापले, मात्र काही सदस्यांनी मध्यस्थी करुन शांतता निर्माण केली.

 निवडणूक अधिकारी अशोक काणकोणकर यांनी निकाल जाहीर केला. तीन तास मतदान चालले, त्याची मतमोजणीसाठी करण्यासाठी दोन तास लागले. एकही मत बाद झाले नाही. अगोदरचीच कार्यकारिणी पुन्हा विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

 वंसकर पुन्हा भरघोस मतांनी विजयी

अध्यक्षपदासाठी रमेश वंसकर हे 96 मते घेऊन विजयी झाले तर सुरेश नाईक हे 42 मते घेऊन पराभूत झाले.

उपाध्यक्षपदासाठी वंसकर पॅनलचे विठ्ठल गावस (54 मते) विजयी झाले तर नाईक पॅनलचे माजी आमदार धर्मा चोडणकर (42 मते) व शंभू भाऊ बांदेकर (33), यांना पराभव पत्करावा लागला.

दोन कार्यवाह पदांसाठी वंसकर पॅनलचेच सुहास बेळेकर (106, सर्वाधिक मते), व त्याच पॅनलच्या चित्रा क्षिरसागर (105 मते) विजयी झाले. सुदेश आर्लेकर यांचा (39 मते) दणदणीत पराभव झाला.

कोषाध्यक्षपदासाठी वंसकर गटाचे राजमोहन शेटये (91 मते) विजयी झाले तर नाईक गटाचे प्रमोद कारापूरकर (39 मते) यांचाही दणदणीत पराभव झाला.

कार्यकारिणी सदस्यांच्या सहा पदांसाठी वसंकर पॅनलचे प्रकाश तळावडेकर, गुरुनाथ नाईक, दशरथ परब, हेमंत खांडेपारकर, लीना पेडणेकर आणि विनायक नाईक हे विजयी झाले.

आमच्या कार्यकारिणीच्या कार्याचे फळ मिळाले वंसकर

निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष रमेश वंसकर म्हणाले की, आम्ही केलेल्या कार्याची पावती सदस्यांनी आम्हाला दिली. काही अकार्यक्षम व्यक्तींनी आमचा अपप्रचार केला, मात्र चांगल्या व्यक्ती आमच्या पाठिमागे उभ्या राहिल्या ज्यांनी आमचे कार्य प्रत्यक्ष पाहिले यांनी आम्हाला मतदानाच्या रुपाने आशीर्वाद दिला, आणि साहित्याची सेवा करण्याची आम्हाला पुन्हा संधी दिली. यापुढे सकारामत्क वृत्तीच्या लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या बरोबरीने मंडळाचे कार्य पुढे नेण्यात येईल, असे ते म्हणाले

Related Stories

ओल्ड गोव्यात मोठे भूसपाटीकरण, जंगलतोड

Amit Kulkarni

कला निकेतन सांस्कृतिक मंडळाच्या वर्धापनदिन सोहळा

Amit Kulkarni

येत्या विधानसभा निवडणुकीत सांगेतून भाजपच जिंकणार

Patil_p

पेडणे तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

Omkar B

दोन गोलांच्या पिछाडीवरून सेसाने साधली गार्डीयन एंजलशी बरोबरी

Amit Kulkarni

काजूला रु 125 आधारभूत किंमत द्यावी

Omkar B
error: Content is protected !!