तरुण भारत

नेहरूनगरमधील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

रहिवाशांनी स्वखर्चाने केली गटारींची स्वच्छता : कचरा उचल करण्यास मनपाकडून टाळाटाळ

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरातील गटारींची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वच्छता कंत्राटदारांची आहे. मात्र, नेहरूनगर परिसरात मनपाच्या स्वच्छता कामगारांच्या वसाहतीशेजारी स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रहिवाशांनी स्वखर्चाने गटारींची स्वच्छता करवून घेतली. मात्र, काढलेला कचरा उचलण्यासही मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार होत आहे.

कचऱयाची उचल करण्यासह गटारांची स्वच्छता करण्याचे कंत्राट मनपाने दिले आहे. मात्र, काही ठिकाणी कचऱयाची उचल वेळेवर केली जात नसल्याच्या तक्रारी होत असतात. काही भागातील कचऱयाची उचल करण्यास कानाडोळा करण्यात आला आहे. नेहरूनगर दुसरा
क्रॉस परिसरातील कचऱयाची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  गटारींची स्वच्छता करण्याची सूचना करूनही याची दखल घेण्यात आली नाही. परिसरात मनपा स्वच्छता कामगारांची वसाहत असूनही स्वच्छतेकडे कानाडोळा करण्यात आला आहे.

या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. मनपा आरोग्य विभागाकडे तसेच स्वच्छता निरीक्षकाकडे तक्रार करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

अस्वच्छता आणि गटारींमधील कचऱयामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारींमध्ये सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे रहिवाशांनी स्वखर्चाने गटारींमधील कचरा काढला. काढण्यात आलेला कचरा घेऊन जाण्याची विनंती महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना व आधिकाऱयांना केली. तरीदेखील कचऱयाची उचल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा साचला आहे. परिसरात घाण साचून दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील कचऱयाची उचल त्वरित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

हलगा येथे एकाचा निर्घृण खून

Amit Kulkarni

कर्नाटक : राज्यात दररोज ३५ हजार अँटीजन चाचण्या करण्याचे उद्दिष्ट

Abhijeet Shinde

परराज्यातून येणाऱया चाकरमान्यांच्या संख्येत वाढ

Patil_p

अटी शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा

Rohan_P

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

Patil_p

भाजी खरेदीसाठी गेले अन् क्वारंटाईन झाले

Patil_p
error: Content is protected !!