तरुण भारत

बेळगावात घरफोडय़ांचे प्रकार सुरूच

अमननगर, बसव कॉलनी येथे बंद घरे फोडली

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व उपनगरात घरफोडय़ांचे प्रकार सुरूच आहेत. गुन्हेगारांनी बंद घरांना लक्ष्य बनविले असून अमननगर व बसव कॉलनी येथे दोन घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबविली आहे. माळमारुती व एपीएमसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केले आहेत.

अमननगर येथील माजी सैनिकाचे घर फोडण्यात आले आहे. समीर कुडन्नवर हे निवृत्त सैनिक असून पोलीस दलात त्यांची भरती झाली आहे. ते प्रशिक्षणासाठी बेळगावबाहेर आहेत. त्यांची पत्नी शाहीन याही माहेरी गेल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून त्यांचे घर बंद होते. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविला आहे.

शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटय़ांनी कपाटातील 12 तोळे सोन्याचे दागिने लांबविले आहेत. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. रात्री नोंद करून घेण्यात आली आहे.

दुसरी घटना बसव कॉलनी येथे घडली आहे. शांता गुरुलिंगय्या देसाई या 24 जानेवारी रोजी कामानिमित्त बेंगळूरला गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी कपाटातील एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व एक कॅमेरा पळविला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

रात्री 9.30 पर्यंतच नाताळ साजरा करा

Omkar B

शाळा पूर्णवेळ भरलो अन् मुले आनंदली!

Amit Kulkarni

शनिवार खूट येथे पाणी गळती

Amit Kulkarni

आयकर विभागातर्फे कार्यक्रम

Patil_p

मध्यान्ह आहार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करा

Patil_p

विलीनीकरणासाठी नव्हे तर एकीसाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni
error: Content is protected !!