तरुण भारत

देशात दिवसभरात 13 हजार कोरोना रुग्ण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात कोरोना संसर्गाचा जोर आणखी कमी झाला आहे. सोमवारी दिवसभरात 13 हजार 52 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 127 जणाचा मृत्यु झाला आहे. तर कोरोनावरील दोन लसींचा समाधानकारक वापर सुरु झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Advertisements

देशात सध्या कोरोना योद्धय़ांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सोमवारी देशात 13 हजार 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 हजार 965 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 127 जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोना संक्रमणाला देशात 1 वर्ष पूर्ण झाले असून गतवर्षी 30 जानेवारीला केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 7 लाख 46 हजार 183 वर पोहोचली आहे. तर 1 कोटी 4 लाख 23 हजार 125 रुग्ण बरे झाले आहेत. तर या कालावधीत 1 लाख 54 हजार 274 जणांचा मृत्यु झाला आहे. देशभरात सध्या 1 लाख 68 हजार 784 जणांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

घोटाळेबाज चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

Amit Kulkarni

Modi Birthday : पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Abhijeet Shinde

डोंगराखाली 1200 वर्षे जुन्या नगराचे अवशेष

Amit Kulkarni

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 13 ठार

Patil_p

नदियात भाजपला अनुकूल स्थिती

Amit Kulkarni

रिक्षातला बगीचा

Patil_p
error: Content is protected !!