तरुण भारत

आता आले चक्क साडी नेसण्याचे ही कोर्स

प्रतिनिधी/ सातारा

 आजवर आपण विविध कोर्सेस आपल्या आजुबाजुला पाहत आलो आहोत, काही कोर्सेसना तर आपण गेलेलो देखिल आहोत. पण आता चक्क साडी नेसण्याचा कोर्सेस पुणा, मुंबई च्या धर्तीवर साताऱयात देखिल सुरू झाल्याचे पावयास मिळत आहे. कित्तेक वयोवृध्द नागरिक विशेषतः महिला याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. पण बऱयाच युवतींनी या कोर्सेसना पसंती दर्शविली आहे.

Advertisements

 आपल्या राहणीमानाकडे हल्ली प्रत्येकजण विशेष लक्ष देत असतो. व्यक्तीमत्वाची पहिली छाप ही कपडय़ांवरून पडत असते. कारण अजूनही आपल्याकडे कोणताही कार्यक्रम असो अथवा खास समारंभ असो साडी नेसण्यालाच प्राधान्य दिलं जातं. साडी ही एक अशी स्टाईल आहे, जी परंपरागत चालत आली आहे व कायम चालत राहील. याच साडी नेसण्याच्या पध्दतीमध्ये अनेक बदल देखिल झाले आहेत. पण साडीची प्रसिध्दी कधीही कमी झाली नाही. साडीमध्ये महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलुन दिसते.

 त्यामुळे पुर्वीच्या पध्दती प्रमाणे आत्ता कित्तेक युवती या लहान-मोठय़ा कार्यक्रमांना पाश्चात्य पोषाखा पेक्षा भारतीय पारंपारीक पोषाखाला पसंती देत आहे. विशेषतः साडी नेसण्याला पंसती देत आहेत, पण ही साडी व्यवस्थीत पणे नेसता यावी म्हणून काहींना दुसऱयांवर अवलंबुन रहावे लागते. त्यामुळे हे साडी नेसण्याच्या कोर्सेससुरू झाले आहेत.

 पुर्वी कित्येक महिलांना नऊ वारी साडी नेसता यायच्या, पण आत्ता या साडय़ा कित्तेक महिलांना नेसवता येत नाहीत. त्यामुळे कित्तेक जण आपला मोर्चा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रेडीमंड साडय़ांकडे वळविताता. या साडय़ा विविध दरांमध्ये उपलब्ध आहेत.

 यामध्ये नऊवारी साडी, सहावारी साडी, शाही मस्तानी, मस्तानी, ब्राम्हणी, पेशवाई, लावणी, राजलक्ष्मी, जिजाऊ डब्बल कास्टा, धोती स्टईल साडी, जलपरी साडी, स्कार्फ रॅप साडी, केप स्टाईल साडी, बेल्ट स्टाईल साडी आदी 80 हुन अधिक विविध साडी नेसण्याचे प्रकार आहेत. अशा विविध प्रकारच्या साडय़ा नेसण्याच्या पध्दती या कोर्सेस मध्ये शिकविल्या जातात.

 सध्या युवतींमध्ये पारंपारीक पध्दतीच्या साडय़ा विशेषतः नऊवारी साडी नेसण्याची क्रेझ आहे. मुख्य म्हणजे वैदिक पध्दतीच्या विवाहात वधु नऊवाडी साडीतच अधिक खुलुन दिसते. या साडय़ा रेडीमेड प्रकारात देखिल मिळतात. त्या नेसण्याकरीता साईस्कर देखिल असतात पण स्वतः नेसलेल्या साडय़ा अधिक खुलावदार दिसतात त्यामुळे याप्रकारच्या साडय़ा नेसता याव्यात याकरीत कोर्सेस सुरू आहेत.

 सुवर्णा पाटील

Related Stories

ग्राहकांवर महावितरण अधिकाऱ्याची आरेरावी

datta jadhav

महाबळेश्वर पालिकेचे बांधकाम रखडले

Patil_p

”एकतर महामारी त्यात पंतप्रधान अहंकारी”

Abhijeet Shinde

महाबळेश्वरात संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

सदस्य नोंदणीत जिल्हा शिवसेना मागे का ?

Abhijeet Shinde

किरणी मालांच्या दुकानांच्या वेळेबाबत अफवा

Patil_p
error: Content is protected !!