तरुण भारत

पोक्सोतंर्गत आरोपीला ठोठावली सक्तमजुरी

प्रतिनिधी/ सातारा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शहापूर (ता. सातारा) येथील नंदन बापू अडागळे (वय 46) याला न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. पोक्सोंतर्गंत कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्हय़ातील बहुतांशी ही पहिलीच शिक्षा असून यामुळे अल्पवयीन मुलींवर होणाऱया अत्याचाराला पायबंद बसेल.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 24 जून 2018 रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहापूर (ता. सातारा) गावच्या हद्दीत नंदन बापू अडागळे याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

नंदन अडागळे याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक ए. बी. दयाळ यांनी या गुह्याचा तपास करुन न्यायालयात नंदन अडागळे याच्या विरोधात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी सोमवारी अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश पटनी यांच्यासमोर झाली. त्यांनी नंदन बापू अडागळे याला अत्याचार प्रकरणी दोषी धरुन 20 वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सरकारी वकील म्हणून एन. डी. मुके, ए. एस. घार्गे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक शुभांगी भोसले यांनी त्यांना मदत केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी तत्कालीन तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक ए. बी. दयाळ व त्यांच्या पथकातील सर्वांचे अभिनंदन केले.

Related Stories

कोल्हापूर : ‘मोक्का’ ची प्रकरणे आता जिल्हा न्यायाधीश चालविणार

triratna

सोनगाव कचरा डेपोला आग

Patil_p

खंडाळा पोलिसांकडून चोरट्यांची टोळी जेरबंद

datta jadhav

महाराष्ट्र : मागील 24 तासात 55 पोलिसांना कोरोनाची बाधा; 2 मृत्यू

Rohan_P

जिल्ह्यात चार नवे रुग्ण, १६ जण कोरोनमुक्त

triratna

परप्रांतीय मजुरांना भाजपने दिला निरोप

Patil_p
error: Content is protected !!