तरुण भारत

CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


CBSE बोर्डच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाली असून त्या दहावीची आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 11 जून या दरम्यान घेण्यात येत आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल.

Advertisements


cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करणे शक्य आहे.


देशभरातील विविध राज्यातील दहावी आणि बारावीसाठी CBSE बोर्डच्या वतीनं परीक्षा घेण्यात येतात. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी सांगितले होते की 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा या 4 मे ते 10 जून दरम्यान तर बारावीची परीक्षा ही 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे.

CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीसाठीच्या या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोरोना काळात बरेच काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. पण कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून ही या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पण हे करताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये CBSE च्या वतीने आधीच जाहीर करण्यात आले आहे की प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील. त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. CBSE परीक्षांचा निकाल हा 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

काम दाखवा न्हायतर टपल्याच बसतील

datta jadhav

कोकण मार्गावर धावली ‘मोदी एक्सप्रेस’

triratna

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत

prashant_c

सोलापूर शहरात 64 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, चौघांचा मृत्यू

triratna

वाराणसी – जौनपुर हायवेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; 10 जखमी

Rohan_P

बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार

Rohan_P
error: Content is protected !!