तरुण भारत

मालवण न.प.च्या डंपिंग यार्डला पुन्हा आग

डंपिंग यार्डमधील ट्रान्सफॉर्मर जळाला

 ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱयांकडून न. प. प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त

Advertisements

वार्ताहर / मालवण:

मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील डंपिंग यार्डला आग लागण्याचे सत्र अद्याही सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास पालिकेच्या डंपिंग यार्डला आग लागली. या दुर्घटनेत डंपिंग यार्डमधील टान्सफॉर्मरही जळाला. डंपिंग यार्डला आग लागल्याचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱयांनी न.प. प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, वारंवार कचरा डंपिंग यार्डला लागत असलेल्या आगीसंदर्भात अज्ञातांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश मुख्याधिकारी यांना दिल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

आडारी डंपिंग यार्डला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग लागण्याची घटना घडत असल्याने ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱयांनी न.प. अधिकाऱयांना धारेवर धरले.  शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, बाबी जोगी, बाळू नाटेकर, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते. ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले हेते. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी जेसीबी चालकास बोलावून जळालेला कचरा रस्त्यावरून बाजूला करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जळालेला कचरा जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला.

 मुख्याधिकारी जबाबदार – बाबी जोगी

बाबी जोगी म्हणाले, डंपिंग यार्डच्या कचऱयासंबंधी काही दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱयांची भेट घेतली होते. त्यावेळी मुख्याधिकाऱयांना कचरा प्रश्नाची गंभीर स्थिती निदर्शनास आणून दिली होती. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे डंपिंग यार्डमधील कचरा प्रश्नाला मुख्याधिकारीच जबाबदार आहेत.

डंपिंग यार्डमधील कचरा रस्त्यावर

आडारी येथील डंपिंग यार्डमधील कचरा आडारी-मालवण मुख्य रस्त्यावर आल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. येथे मोठय़ा प्रमाणात मोकाट जनावरे येतात. जनावरांमुळे कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

     महिनाभरात कचरा व्यवस्थापन सुरळीत!

 नगराध्यक्ष कांदळगावकर म्हणाले, कचरा प्रश्नासंदर्भात आपण स्वत:हून लक्ष घालणार आहे. महिन्याभरात कचरा व्यवस्थापन सुरळीत होणार आहे. तसे आदेशही न. प. प्रशासनाला दिले आहेत. कचरा यार्डला वारंवार लागत असलेल्या आगीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱयांना देण्यात आले आहेत.

Related Stories

देयके 22 कोटीची, आले फक्त साडेतीन कोटी

NIKHIL_N

रत्नागिरीतून आलेल्या मासळीची राजरोस विक्री

NIKHIL_N

आरटीओ कार्यालयात महाघोटाळा उघडकीस

NIKHIL_N

‘चिपळूण नागरी’कडून मुख्यमंत्री सहाय्यतेसाठी 1 कोटीची मदत

Patil_p

पुरळला झाले आगळे ‘शुभमंगल सावधान’

NIKHIL_N

फोंडा हवेलीनगर येथे घरात लपवलेला गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

triratna
error: Content is protected !!