तरुण भारत

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

ट्रिपल कॅमेरासह मल्टी कलर्सचा पर्याय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisements

पोकोने भारतीय बाजारामध्ये आपला ‘पोको एम-3’ स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेची सुविधा राहणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रगन 662 प्रोसेसरसोबत 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

फोनमध्ये मल्टी कलर्स पर्यायांची निवड करुन ग्राहकांना सदरचा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. यासोबतच पोकोएम-2 याचे अपग्रेड व्हर्जन आहे. रियलमी 7 आय सॅमसंग गॅलेक्सी एम-11 आणि मोटोरोला जी-9 पॉवर या मॉडेलशी पोकोची मोठी टक्कर राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

सदरचा स्मार्टफोन दोन मॉडेलमध्ये सादर केला आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 10,999 रुपये आहे आणखी एका 6 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज फोनची किमत 11,999 रुपये आहे.

फोनमधील फिचर्स

पोकोच्या नव्या फोनमध्ये दोन नॅनो सिमचा वापर करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले. अँड्रॉइडमध्ये 10 बेस्ट एमआययुआय 12 ऑपरेटिंग सिस्टमवर वापरता येणार आहे. डिस्प्ले 6.53 इंच पूर्ण एचडी राहणार आहे.

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B

दोन वर्षांच्या वॉरंटीसोबत ‘वनप्लस 9’ होणार सादर

Patil_p

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

एलजी विंग स्मार्टफोन 28 ऑक्टोबरला भारतात

Patil_p

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p
error: Content is protected !!