तरुण भारत

विमा क्षेत्रात विदेशी कंपन्यांची हिस्सेदारी फायद्याची

अधिकची गुंतवणूक वाढणार – ग्राहकांसाठी उपलब्ध होणार विविध उत्पादनांचा पर्याय

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

जनरल आणि लाईफ इन्शुरन्स क्षेत्रामध्ये थेट विदेशी (एडीआय) गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही मर्यादा 49 टक्के होती. सदरची अतिरीक्त वाढ केल्याने याचा फायदा ग्राहकांना भविष्यात होणार आहे. इन्शुरन्समध्ये विविध उत्पादनांचा पर्याय ग्राहकांना यापुढे उपलब्ध होणार आहे.

देशातील विमा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि त्यामध्ये अधिकची गुंतवणूक होण्यासाठीची योजना आखली जात आहे. विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक होणार असल्याने या क्षेत्राला विस्ताराची संधी उपलब्ध होईल.

कोणाला कसा मिळणार लाभ

जनरल आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना यातून फायदा होणार असून यातून विदेशी कंपन्यांना भारतीय विमा कंपन्यांमधील अधिकची हिस्सेदारीची मालकी मिळणार आहे. सदरची गुंतवणूक ही कंपन्यांच्या मूल्यावरुन निश्चित केली जाणार आहे.

ग्राहकांना होणार लाभ

ग्राहकांना विविध उत्पादनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये विविध प्रकारची उत्पादने निवडण्याचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषकरुन जनरल हेल्थ इन्शुरन्स आणि वाहनांच्या विम्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांना काय फायदा

कंपन्यांकडे जर पैसा आला तर त्या आलेल्या पैशातून आपली गुंतवणूक वाढवू शकतात. यातून अधिकची कार्यालये सुरु करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यावर कंपन्या भर देऊ शकतील. देशभरातील गावांमध्ये आणि लहान शहरापर्यंत पोहचून विविध विमा कंपन्यांना आपला व्यवसाय विस्तारता येणार आहे. सरकारला विदेशी गुंतवणूक मिळणार आहे. अधिकच्या गुंतवणुकीमुळे कर प्राप्त होणार आहे. 

Related Stories

सोना कॉमस्टारचा आयपीओ लवकरच होणार सादर

Patil_p

13 फॉरेक्स कंपन्यांचा आरबीआयकडून परवाना रद्द

Patil_p

खराब सुरूवातीनंतर शेअर बाजार तेजीसह बंद

Patil_p

मर्सीडीजची लक्झरी सुव्ह जीएलएस दाखल

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टी वधारत नव्या उंचीवर

Patil_p

ऍमेझॉनकडून लवकरच हजारोंना रोजगार

Patil_p
error: Content is protected !!