तरुण भारत

जानेवारीमध्ये निर्यात 5 टक्क्यांनी वाढली

   नवी दिल्ली 

 नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत निर्यात क्षेत्राने वाढीसह दिलासा दिलेला आहे. जानेवारी 2021 मध्ये निर्यात 5.37 टक्क्यांनी वधारुन 27.24 अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. ज्यामध्ये मुख्य स्वरुपात औषध आणि इंजिनिअरिंग क्षेत्राचे योगदान अधिकचे राहिले आहे.

निर्यातीला बऱयापैकी बळकटी प्राप्त झाली आहे. जगासोबत देशातील कोरोनाची स्थिती काही प्रमाणात सावरत आहे. यामुळे विविध देशांच्या उद्योगांनी आता मोठय़ा प्रमाणात गती घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आयात कमी करत निर्यातीवर भर देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याचा लाभ निर्यात वाढीत दिसला आहे. जानेवारीत आयात दोन टक्क्यांनी वाढून 42 अब्ज अमेरिकन डॉलर राहिली आहे. या प्रकारे समीक्षकांच्या माहितीनुसार महिन्याला देशाचा व्यापार 14.75 अब्ज अमेरिकन डॉलर राहिला आहे. औषध, इंजिनिअरिंग क्षेत्राची निर्यात अनुक्रमे 16.4 टक्के, जवळपास 19 टक्क्यांनी वाढली.

Related Stories

5-जी बाजारपेठेची उलाढाल 31 लाख कोटी डॉलर्सवर?

Omkar B

गुगलचे दुसरे क्लाउड रीजन लवकरच दिल्लीमध्ये

tarunbharat

प्रथमच एचडीएफसीचे बाजारमूल्य 5 लाख कोटीवर

Patil_p

भारतात लवकरच मस्क यांची इंटरनेट सर्व्हिस

Patil_p

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

दोन देशांतील विक्रीवर बंदी : जॉन्सन ऍण्ड जॉन्सनचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!