तरुण भारत

अर्थसंकल्पाचा प्रभाव – सेन्सेक्स-निफ्टी मजबूत

सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला – एसबीआयचे समभाग तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर केलेल्या भरघोस तरतुदीमुळे आणि विमा क्षेत्रात होणाऱया बदल करण्याच्या घोषणेचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक झाल्याने बाजारांनी विक्रमी टप्पा प्राप्त करत नवा उच्चांक प्राप्त केल्याचे सोमवारी पहावयास मिळाले होते. तेजीचा प्रभाव दुसऱया दिवशी मंगळवारीही बाजारात दिसला. सेन्सेक्सने 1200 अंकांची तेजी प्राप्त करत मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.

दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1,197.11 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,797.72 वर स्थिरावला. तसेच सेन्सेक्सने 50,000 पर्यंतचा टप्पा प्राप्त केला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 366.65 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 14,647.85 वर स्थिरावला आहे. शेअर बाजाराने अर्थसंकल्प सादरीकरणादिवशी आणि मंगळवारी अशा दोन दिवसांमधील कामगिरीत 3,511 अंकांनी वधारुन 7.58 अंकांची मजबूती प्राप्त केली आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी भारतीय स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक सात टक्क्यांनी वाढले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग नफ्यात राहिले आहेत.

अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे कोरोना, कर आणि आयकर यावर अधिभार लागण्याचे संकेत होते, परंतु या तरतुदी अर्थसंकल्पात न केल्यामुळे शेअर बाजाराने उच्चांकी कामगिरी केल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र अमेरिकेमध्ये प्रोत्साहन पॅकेजसंदर्भात चर्चा सुरु आहे, तर आशियातील अन्य बाजारात तेजीचा माहोल राहिला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशानी मजबूत होत, 72.96 वर बंद झाला आहे. विदेशी संस्थांकडून सोमवारी जवळपास 1,494.23 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी करण्यात आली.

Related Stories

सप्टेंबरमध्ये युपीआयअंतर्गत विक्रमी व्यवहाराची नोंद

Patil_p

मुंबईसह सहा विमानतळावर अदानीचा ताबा

Patil_p

नोकियाकडून 5-जी उपकरणांची निर्मिती सुरु

Patil_p

अर्थव्यवस्थेला एक धक्का और दो

Omkar B

इंडसइंड बँकेच्या पहिल्या मेटल क्रेडिट कार्डवर विशेष सुविधा

Patil_p

बीएसएनएल-एमटीएनएलमध्ये पुन्हा कर्मचारी भरती?

Patil_p
error: Content is protected !!