तरुण भारत

बुड्रय़ानकोळ येथे मनरेगातून धरणाची निर्मिती

98.8 लाख लीटर पाणी क्षमतेचे छोटेखानी धरण : जमिनीची पाणीपातळी वाढविण्यासाठी मोठी धडपड

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयात तलाव, धरणे व बंधाऱयांमधून पाणी कशाप्रकारे जमिनीत जिरवता येईल, यावर अधिक भर देण्यात येत आहे. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी मोठय़ा प्रमाणात तालुक्मयातील तलाव, नाले व डोंगराळ भागातून वाया जाणाऱया पाण्याला अडवून ते जमिनीत जिरवून पाणी पातळी वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.

 नुकतेच बेळगाव तालुक्मयातील बुड्रय़ानकोळ येथे छोटेखानी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या पावसाळय़ामध्ये त्याचा मोठा फायदा होणार आहे. या छोटेखानी धरणात सुमारे 98.8 लाखाहून अधिक लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता हे धरण अनेकांना उपयोगाचे ठरणार आहे.

उद्योग खात्री योजनेतून बेळगाव तालुक्मयाचा विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे आता वेगवेगळय़ा ठिकाणी अधिकाऱयांनी तलाव खोदाईचे काम हाती घेऊन कामगारांना कामाला लावले आहे. होनगा ग्राम पंचायतच्या अखत्यारीत येणाऱया बुड्रय़ानकोळ या गावालगत असलेल्या डोंगराळ भागात हे छोटेखानी धरण बांधण्यात येत आहे. यासाठी 60.60 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. उद्योग खात्रीतूनच या धरणाची निर्मिती करण्यात येत असल्याने अनेकांना रोजगार व विकासाला गती अशीच युक्ती म्हणावी लागेल.

1,337 कामगारांना काम

आतापर्यंत 38.10 लाख रुपयांचे काम करण्यात आले आहे. अजूनही 22.50 लाख रुपयांचे काम होणे बाकी आहे. सध्या या कामाला गती देण्यात आली असून आतापर्यंत दररोज 1 हजार 337 कुटुंबातील कामगारांनी काम केले असून 7 हजार 896 दिवस हे काम झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बुड्रय़ानकोळ येथे सध्या छोटेखानी धरणाच्या खोदाईसाठी उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळाले असून यानंतर शेतामधील पाणंद रस्त्याच्या डागडुजीसाठी उद्योग खात्रीतून प्रयत्न करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्री योजनेतून वेगवेगळी कामे हाती घेण्यात येत आहेत. नुकतीच तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, तालुका पंचायतीचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, तांत्रिय साहाय्यक अभियंते नागराज यरगुद्दी आदींनी भेट देऊन पाहणी केली.

ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी

या धरणाचे काम अजूनही 60 ते 70 टक्के होणे बाकी आहे. हे धरण तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे. या तलावाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे तेथील कामगार वारंवार कामासाठी मागणी करत होते. परिसरात धरण खोदण्यासाठी अनेक कामगारांना काम देण्यात आले. वारंवार कामांची पाहणी व कामगारांना काम देण्यासाठी  धडपडत आहोत. तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात कामांना गती देण्याचे काम करण्यात येत आहे. बऱयाच ठिकाणी उद्योग खात्रीतून कामांना गती देण्यात येत आहे. याचबरोबर हळेहोसूर व बुड्रय़ानकोळ येथेही कामगारांना काम उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक रेल्वे होणार पूर्ववत

Patil_p

कंग्राळी खुर्द ग्रा. पं. मध्ये 11 अर्ज अवैध

Patil_p

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni

रात्रभर भजन करून नववर्षाचे स्वागत

Patil_p

सरकार गांधीनगर, अक्षत स्पोर्ट्स संघ विजयी

Amit Kulkarni

परिवहन संप पुकारल्याने बाजारपेठेवर परिणाम

Patil_p
error: Content is protected !!