तरुण भारत

नंदिहळ्ळी येथील रेल्वेमार्गात बदल करा

खासदार इराण्णा कडाडी यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट : बदल करण्याचे मंत्र्यांकडून आश्वासन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग नंदिहळ्ळीसह इतर सुपीक जमिनीतून करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यात बदल करून शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे या मार्गात बदल करावा, यासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेतकऱयांनी खासदार इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. ही मागणी खासदार इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. त्यांनी शेतकऱयांना मारक ठरणार नाही अशा पद्धतीने मार्ग निवड करू, असे आश्वासन इराण्णा कडाडी यांना दिले. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग करण्यासाठी सरकार हालचाली गतिमान करत आहे. मात्र, हा रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून जात असल्याने मोठी समस्या निर्माण होणार आहे. ही जमीन तिबारपिकी असून यामधून रेल्वेमार्ग केल्यास मोठी समस्या निर्माण होणार असून शेतकऱयांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग इतरत्र खडकाळ जमिनीतून न्यावा, अशी मागणी शेतकऱयांनी लावून धरली होती.

दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनीही याला संमती देऊन खडकाळ जमिनीतूनच हा मार्ग निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने या मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे या परिसरातील शेतकऱयांनी अनेक वेळा निवेदने व आंदोलने करण्याचा इशारा दिला. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. नुकतीच या परिसरातील शेतकऱयांनी खासदार इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन सुपीक जमिनीतून हा मार्ग केल्यास मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

 दखल घेण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

त्यावेळी कडाडी यांनी आपण तातडीने पाऊल उचलून सुपीक जमिनीऐवजी इतरत्र खडकाळ जमिनीतून हा मार्ग नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मंगळवारी भेट घेऊन बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत शेतकऱयांच्या होणाऱया नुकसानीची माहिती दिली. सदर मागणीचे एक निवेदन देऊन हा मार्ग इतरत्र जमिनीतून न्यावा, अशी मागणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत आपण नक्कीच विचार करू व शेतकऱयांच्या सुपिक जमिनीतून हा मार्ग जाणार नाही याची दखल घेऊ, असे आश्वासन दिले. यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

बसची अपुरी संख्या प्रवाशांसाठी त्रासदायक

Patil_p

अनगोळ मेन रोडवर मोठमोठे खड्डे

Amit Kulkarni

कंत्राटी आरोग्य कर्मचारी आजपासून संपावर

Patil_p

खानाप़रातील विद्यार्थी वसतिगृहात क्वॉरंटाईन नको

Patil_p

विविध मागण्यांसाठी बेळगुंदी येथील तरुणांचे आरोग्य केंद्राला निवेदन

Patil_p

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी आज बेळगावात

Amit Kulkarni
error: Content is protected !!