तरुण भारत

बेजोस लवकरच सीईओ पद सोडण्याचे संकेत

निवृत्त होत नसल्याचे बेजोस यांचे स्पष्टीकरण – ऍन्डी जेसी यांच्याकडे येणार ऍमेझॉनची धुरा

मुंबई  –

Advertisements

 जगासाठी ऑनलाईन व्यापाराचे जाळे पसरवून त्यामध्ये उच्चांकी झेप घेत आपल्या कंपनीला वेगळय़ा उंचीवर पोहोचविण्याची यशस्वी कामगिरी करणारे आणि मागील महिन्यापर्यंत जगातील सर्वाधिक धनाढय़ म्हणून गणले जाणारे ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस मुख्य कार्यकारी (सीईओ) पद चालू वर्षातील तिसऱया तिमाहीपर्यंत सोडणार असल्याची माहिती आहे.

यावेळी मात्र त्यांनी आपण निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता या जागेवर ऍन्डी जेसी यांची सीईओ म्हणून नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे.  बेजोस यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बेजोस यांनी यावेळी आपल्या कर्मचाऱयांना पत्र लिहून जेसी आता आपली नवी भूमिका लवकरच स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. नवे सीईओ जेसी उत्कृष्ठ नेतृत्त्व आपल्या कार्यातून सिद्ध करतील, यात कोणतीही शंका नसल्याचे बेजोस यांनी स्पष्ट केले आहे.

नव्या सीईआंची ओळख

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ऍन्टी जेसी लवकरच विराजमान होण्याचे संकेत आहेत. जेसी यांनी ऍमेझॉनमध्ये 1997 मध्ये मार्केटिंगपासून करिअरला सुरुवात केली होती आणि आजतागायत उत्तमपणे सेवा बजावत आहेत. 2003 मध्ये कंपनीमधील क्लाउड सेवा देण्यासाठी त्यांनी एडब्लूएसची सुरुवात केली.

ऍमेझॉनचा प्रारंभ बुक स्टोरसोबत बेजोस यांनी वर्ष 1994 मध्ये एक ऑनलाईन बुक स्टोरच्या रुपात ऍमेझॉनची सुरुवात केली होते. आता हीच कंपनी विशाल अशा ऑनलाईन रिटेलरमधील दिग्गज कंपनी ठरली आहे. जगभरात कंपनीचा विस्तार असून यामध्ये सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री ऍमेझॉनच्या प्लॅटफॉर्ममधून केली जाते.

Related Stories

सोने आयात 81.22 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

व्होडाफोन-आयडियाचे प्लॅन पुन्हा महागणार

Patil_p

नकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स घसरणीत

Patil_p

अमेरिकेच्या व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सची रिलायन्स ‘जिओ’मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

जाणून घ्या ओलाच्या नवीन ऍपविषयी

Patil_p

बाजारात सेन्सेक्स 660 अंकांनी मजबूत

Patil_p
error: Content is protected !!