तरुण भारत

सनी देओलची लवकरच ओटीटीमध्ये एंट्री

डिजिटल पदार्पणातून करणार धमाल

सनी देओल सध्या राजकारण आणि चित्रपटक्षेत्रातील कारकीर्द दोन्हींमध्ये संतुलन राखून आहेत. याचदरम्यान सनी आता लवकरच डिजिटल पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. झी5 प्रॉडक्शनसह डिजिटल पदार्पण करणाऱया सनी यांनी ‘जी 49’ या सीरिजचे चित्रिकरणही सुरू केले आहे. मुंबईतील मड आयलँडमध्ये हे चित्रिकरण चालू आहे.

Advertisements

बॉबी देओल यांना डिजिटल पदार्पणातून मिळालेले यश पाहता सनी यांनी त्यांचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला असावा. बॉबी यांना आश्रम सीरिजनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत.

सनी देओल 2019 मध्ये ‘ब्लॅक’ या चित्रपटात दिसून आले होते. त्यानंतर ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शकीय कौशल्यही पडताळून पाहिले आहे. या चित्रपटातून सनी यांचा पुत्र करणने या क्षेत्रात पदार्पण केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छाप पाडू शकला नव्हता.

Related Stories

अमीर खानचे तिसरे लग्न ?

Patil_p

राज कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ तारखेला सुनावणी

Abhijeet Shinde

तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार सोनाक्षी सिन्हा

Amit Kulkarni

पडद्यावर एकत्र झळकणार कपूर भगिनी

Patil_p

आता भरा 20 लाखांचा दंड

Patil_p

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिताच्या अडचणीत वाढ; मुंबईत गुन्हा दाखल

Rohan_P
error: Content is protected !!