तरुण भारत

जीसीए सीनियर संघ प्रशिक्षकपदी प्रकाश मयेकर; कामत ज्युनियर्सचे प्रशिक्षक

मडगाव : दोड्डा गणेशने गोवा सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा जीसीएचे क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर यांच्याकडे परत एकदा देण्यात आली आहे. कालपासून पणजी जिमखानाच्या बांदोडकर क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या सीनियर संघाच्या सराव शिबिरात प्रकाश मयेकर यांनी कार्यभार स्वीकारला.

येत्या काही दिवसात विजय हजारे एक दिवशीय लढतींच्या स्पर्धेसाठी गोव्याचा सीनियर संघ निवडण्यात येणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर दोड्डा गणेश आजारी पडल्यामुळे संघात सामील होऊ शकला नाही. या कारणास्तव प्रकाश मयेकर यांना जीसीएने प्रशिक्षकपदी नियुक्त केले.

Advertisements

गोवा क्रिकेट संघटनेने आपल्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून परत एकदा राजेश कामत यांची नियुक्ती केली असल्याची माहिती जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी दिली.  गेल्या क्रिकेट मोसमात गोव्याच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाने प्लेट गटात आणि एकदिवशीय लढतीच्या स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले होते. काल राजेश कामत गोव्यात आले. आज गुरुवारी ते पीसीएवर जाऊन 19 वर्षाखालील क्रिकेटपटूंच्या शिबिराचा ताबा घेतील. बीसीसीआय 19 वर्षाखालील गटात एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार असून यासाठी क्रिकेटपटूंचे शिबिर पर्वरी क्रिकेट अकादमीवर सुरू आहे.

Related Stories

दाबोळी विमानतळ लवकर सुरु करावा

Patil_p

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

फातोर्डातील प्रभाग 9 मध्ये वनमहोत्सव

Amit Kulkarni

सेरुला भूखंडप्रकरणी तीन आठवडय़ात उत्तर सादर करा

Patil_p

किनारी व्यवस्थापन आराखडय़ात गंभीर चुका

Amit Kulkarni

भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी ‘आप’ला पाठिंबा द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!