तरुण भारत

अनगोळ येथे शिवभक्त दाम्पत्य-खेळाडूंचा सत्कार

अनगोळ मॉर्निंग वॉकर्सतर्फे कार्यक्रमाचे आयोजन : खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पद

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

अनगोळ, बाबले गल्ली येथील बुद्रुक कुटुंबातील अभिषेक व हर्षदा या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या लग्नानंतर रायगडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या नवजीवनाला सुरुवात करून एक आदर्श निर्माण केला.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवषी होणाऱया गडकोट मोहिमेत भाग घेत असणाऱया अभिषेक याने गुरुवर्य भिडे गुरुजी यांना आदर्शवत व आपले गुरु मानून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या नववधूसह संसाराची सुरुवात छत्रपतींच्या दर्शनाने केली.

अनगोळ येथील शुभांगी प्रमोद काकतकर व वैभवी बाळू बुद्रुक यांनी राज्यस्तरीय ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत बेळगाव जिल्हा ऍथलेटिक्स संघातून भाग घेत दोन्ही खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकाविला. याबद्दल अनगोळ मॉर्निंग वॉकर्स यांच्यातर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला.

अनगोळ, नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकाका कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, गुंडू शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कृष्णा जठार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मॉर्निंग वॉकर्सतर्फे गुंडू शेलार व यल्लाप्पा देमजी यांनी नवदाम्पत्याचा शाल व माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे यांनी शिवमूर्ती भेट देऊन सत्कार केला.

शुभांगी काकतकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अनगोळ, बाबले गल्ली येथील दोन युवा ऍथलिट्स खेळाडूंचाही मॉर्निंग वॉकर्सतर्फे सत्कार करण्यात आला. शुभांगी प्रमोद काकतकर हिने मुडबिद्री येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत 3 हजार मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. गुवाहाटी येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

वैशाली बाळू बुद्रुक हिने राज्यस्तरीय ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेत भाग घेऊन 300 मी. धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. वैशाली हिचीही गुवाहाटी येथे होणाऱया राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांचाही शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण अनगोळ गावचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत अनगोळच्या मॉर्निंग वॉकर्सतर्फे सत्कार करण्यात आला.

 यावेळी सुदर्शन भेंडीगेरी, महेंद्र हणमण्णावर, सुधीर पानारी, बाळू जाधव, महादेव पवार, प्रमोद पाटील, यल्लाप्पा बांडगे, बाळू तहसीलदार, बाळू देसाई, बाहुबली हणमण्णावर, पुरुषोत्तम चौगुले, कृष्णा सोमणाचे, कृष्णा बाबले, परशराम जवरुचे, बाबुराव कंग्राळकर, संजय पानारी, हिरा शिंदोळकर, कविता बुद्रुक, अंकिता बुद्रुक आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

बसपासची ऑनलाईन पद्धत रद्द करा

Amit Kulkarni

भुवनेश्वरी उत्सव साधेपणाने

Omkar B

रामायण महाभारतचे पुनरागमन

tarunbharat

कोरोनामुळे सरकारी शाळांची पटसंख्या वाढली

Patil_p

नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षपदी निंगव्वा कुरबर यांची निवड

Amit Kulkarni

आरोग्य तपासणीअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱयांची कोविड चाचणी

Patil_p
error: Content is protected !!