तरुण भारत

जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

ऑनलाईन टीम / जम्मू :

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्हाजवळील सीमा रेषेजवळ बुधवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा उल्लंघन केले. सुंदरबनीमध्ये हा गोळीबार केला. संरक्षक प्रवक्त्यांनी सांगितले की, सीमा रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. 2021 मध्ये आतापर्यंत 4 जवान शहीद झाले आहेत.

Advertisements

बुधवारी पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात करण्यात आली. भारतीय सैन्याने ही या गोळीबारास प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक जवान गंभीररित्या जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान, जवानाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांचे नाव सीपाही लक्ष्मण असे आहे. ते जोधपूरचे रहिवासी होते. सीपाही लक्ष्मण हे शूरवीर, प्रेरणादायी आणि समर्पित जवान होते. देशासाठी त्यांनी पत्करलेले हौतात्म्य आणि त्यांची निष्ठा कायम देश लक्षात ठेवेल, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.

Related Stories

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 61 हजारांच्या उंबरठ्यावर

Rohan_P

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; ‘या’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

Rohan_P

पंजाब : उपसभापती अजायब सिंह, मंत्री गुरुप्रीत कांगड यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

कृषी कायद्यात ‘दोष’ नाहीतच!

Patil_p

जनतेचा संसद व न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही : राहुल गांधी

Abhijeet Shinde

तामिळनाडूत कोरोना देवीची स्थापना

Patil_p
error: Content is protected !!