तरुण भारत

कुदेमानी ग्रा.पं. अध्यक्षपदी रेणुका नाईक

उपाध्यक्षपदी विनायक पाटील : दोन्ही जागांची बिनविरोध निवड

वार्ताहर / किणये

Advertisements

कुदेमानी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड दि. 3 केली. अध्यक्षपदी रेणुका रामू नाईक यांची तर उपाध्यक्षपदी विनायक नारायण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गावचा सर्वांगीण विकास व्हावा व एकात्मता टिकून राहावी यासाठी ही निवड बिनविरोध केली आहे.

अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला व उपाध्यक्ष पदासाठी सामान्य असे आरक्षण जाहीर झाले होते. अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमातीसाठी केवळ एकच महिला होत्या. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध होणार हे शिक्कामोर्तब झाले होते.

बुधवारी उपाध्यक्ष पदासाठी शांताराम कल्लाप्पा पाटील व विनायक नारायण पाटील या दोन सदस्यांनी अर्ज दाखल केला. गावातील प्रमुख पंचाच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामपंचायतीचा कारभार एकजुटीने व सुरळीत चालावा या उद्देशाने शांताराम पाटील यांनी माघार घेतली. व विनायक नारायण पाटील यांची उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली.

निवडणूक अधिकारी म्हणून बी. बी. बिरादार यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मुरकुटे, आरती लोहार, अरुण देवण, संजय यल्लुप्पा पाटील, लता शिवनगेकर, विमल सागरे, मल्लव्वा कांबळे आदींसह पीडीओ प्रकाश कुडची, सेपेटरी किल्लेकर, उपस्थित होते.

ईश्वर गुरव, सुरेश पाटील, अर्जुन जांबोटकर, नागेश राजगोळकर, जोतिबा बडसकर, परशराम पाटील, अर्जुन राजगोळकर, वैजनाथ राजगोळकर, महादेव गुरव, दत्ता कांबळे, रामू नाईक, मल्लाप्पा पाटील, वैजू शिवनगेकर, विलास गुरव, मोहन शिंदे, बाळाराम धामणेकर, उमेश नाईक, संभाजी मुरकूटे व इतर प्रमुख मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पीएफ-ईएसआय कार्यालये बेळगावात स्थापन करा

Amit Kulkarni

रोटरी क्लब मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

ऍडव्हान्स सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते

Amit Kulkarni

जोगुळभावी येथे बेळगावच्या वृद्धेचे दागिने लांबविले

Amit Kulkarni

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व

Patil_p

तालुक्यात दुसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने

Amit Kulkarni
error: Content is protected !!